Tea in Presure Cooker : कधी कुकरमध्ये बनवलाय चहा? मग हे ट्राय, एकदा प्यायलात तर सारखी अशीच प्याल

Last Updated:

काहींना प्रेशर कुकरमधील चहाचा कॅन्सेप्ट आवडणार नाही. पण जसं लोक तंदूरी चहा काहीतरी वेगळी चव देते म्हणून पितात. तसंच प्रेशर कुकरमधील चहाला काही वेगळ्या टेस्टसाठी पिऊ शकता.

प्रेशर कुकरमध्ये चहा
प्रेशर कुकरमध्ये चहा
मुंबई : आपल्या घरात सकाळची सुरुवात चहाशिवाय पूर्णच होत नाही. भारतातील जवळ-जवळ प्रत्येक घरात दिवसातून एकदा चहा तर बनतोच. विद्यार्थी आणि कामाला जाणाऱ्या मंडळींसाठी चहा तर जणू काही व्यसनच आहे. चहा प्यायल्या शिवाय त्यांना बरच वाटत नाही. शिवाय तुम्हाला असे देखील काही लोक सापडतील ज्यांचं असं म्हणणं आहे सकाळची चहा जर ते प्यायले नाहीत किंवा वेळेवर मिळाली नाही तर त्यांचा दिवस खराब जातो.
प्रत्येकाची चहा बनवायची आपली वेगळी पद्धत असते. काही आलं टाकून चहा पितात, तर काही वेलची, किंवा दालचीनी, काळीमीरी, गवती चहा टाकून चहा पितात. काहींना जास्त गोड चहा आवडतो. तर काहींना जास्त दुधाचा, तर काही लोक कमी दुधाचा चहा पितात आणि वेगवेगळा चहा बनवण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. अशीच एक पद्धत म्हणजे कुकरचा चहा.
advertisement
काही लोक एक्सप्रिमेंट करायचा म्हणून तर काही बॅचरल मंडळी दुसरं कोणतं भांड नसल्यामुळे कुकरमध्ये चहा बनवतात. पण तुम्हाला माहितीय कुकरचा चहा पिण्याची देखील वेगळीच एक मज्जा आहे. शिवाय त्याची चव देखील खूप वेगळी वाटते. हा चहा जणू दम चहा असल्यासारखी त्याची चव बनते.
एका प्रसिद्ध शेफने व्हिडीओ शेअर करत प्रेशर कुकरमधील चहाची रेसिपी सांगितली आहे. च्यामुळे चहा पिण्याचा आनंद आणि स्वाद तुमचा आणखी वाढेल.
advertisement
प्रेशर कुकरमध्ये चहा बनवण्याची सोपी रेसिपी
आवश्यक साहित्य:
पाणी – 1 कप
दूध – 1.5 कप
चहा पावडर – 1.5 टीस्पून
साखर – चवीनुसार
आले – 1 लहान तुकडा (कुटलेला)
बनवण्याची पद्धत:
कुकरमध्ये साहित्य घाला:
प्रेशर कुकरमध्ये पाणी, दूध, चहा पावडर, साखर, आलं एकत्र घाला. सर्व घटक नीट मिसळा. लक्षात ठेवा की आलं किसलेलं टाकू नका तर ते ठेचलेलं टाका.
advertisement
कुकरचं झाकण घट्ट लावून ठेवा आणि मध्यम आचेवर ठेवा आणि सुमारे 3–4 मिनिटांनी कुकरच्या जेव्हा दोन शिट्टी होतील तेव्हा दोन मिनिट चहा थंड होऊ द्या आणि मगच झाकण उघडा. शिट्टी होताना चहा बाहेर येत असेल तर गॅस लगेच एका शिट्टी नंतर बंद करा.
कुकरचं झाकण सावधपणे उघडा आणि चहा गाळून कपात ओता.
advertisement
या रेसीपीचा व्हिडीओ CookingShooking Hindi नावाच्या युट्यूब अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या आकाउंटवर सगळ्या वेगळ्या रिसिपीचे व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील.
https://youtube.com/shorts/VajY623Mbao?si=slqOaFh8xIVJPuHJ
लक्षात ठेवा गरम-गरम कुकरचं झाकण उघडू नका. नाही तर झाकण उघडताच गरम चहा तोंडावर किंवा अंगावर उडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कुकर थोडं थंड होऊ द्या.
प्रेशर कुकरमधला चहा केवळ झटपट तयार होत नाही, तर त्याची चवही खास लागते. कमी वेळ, जास्त सुगंध आणि परफेक्ट टेस्ट म्हणजे सकाळचा मूड एकदम फ्रेश.
advertisement
काहींना प्रेशर कुकरमधील चहाचा कॅन्सेप्ट आवडणार नाही. पण जसं लोक तंदूरी चहा काहीतरी वेगळी चव देते म्हणून पितात. तसंच प्रेशर कुकरमधील चहाला काही वेगळ्या टेस्टसाठी पिऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tea in Presure Cooker : कधी कुकरमध्ये बनवलाय चहा? मग हे ट्राय, एकदा प्यायलात तर सारखी अशीच प्याल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement