स्वतःच्या 'मर्यादा' ओळखा अन् 'नाही' म्हणायला शिका, तरच मजबूत होईल तुमचं नातं; 'या' 10 टिप्स करतील मदत!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोणत्याही नात्यात भावनांचा आदर आणि मर्यादा (boundaries) ठरवणे महत्त्वाचे आहे, कारण त्या भावनिक आरोग्याचे रक्षण करतात. नात्यातील बंध दृढ करण्यासाठी...
How to say no and set boundaries: नातं कोणतंही असो त्यात भावनांचा आदर करणे, परस्परांबद्दल आदर निर्माण करणे आणि एकमेकांना महत्त्व देणे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नात्यातील मर्यादा म्हणजेच ‘बाउंड्री’ (Boundaries) या तुमच्या भावनिक आरोग्याचे रक्षण करतात. प्रत्येक नात्यात या मर्यादा ठरवल्या पाहिजेत. नात्यातील बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ते अधिक चांगले करण्यासाठी या 10 सोप्या टिप्स तुम्हाला कायम मदत करतील.
तुमच्या मर्यादा जाणून घ्या : तुम्हाला भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कोणत्या गोष्टी स्वीकारण्यासारखा आहेत, हे आधी तुम्ही समजून घ्या. एकदा तुमच्या मर्यादा स्पष्ट झाल्या की, तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला चांगल्याप्रकारे समजावून सांगू शकता.
प्रामाणिकपणे संवाद साधा : तुमच्या भावना आणि गरजा समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगा. यासाठी 'तू असे केलेस', असे न म्हणता, 'मला असे वाटते' अशा वाक्यांचा वापर करा. मनमोकळा संवाद नात्यातील संबंध अधिक घट्ट करतो.
advertisement
शांतपणे ऐका : निरोगी मर्यादा ठरवण्यासाठी परस्परांचा आदर असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही जसे तुमच्या गरजा सांगता, त्याचप्रकारे दुसऱ्या व्यक्तीच्या गरजाही शांतपणे ऐकून घ्या.
सातत्य ठेवा : तुम्ही ठरवलेल्या मर्यादांवर ठाम राहा. यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमचा आदर वाटतो आणि विश्वास वाढतो. जर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहिला नाही, तर समोरच्या व्यक्तीचा गोंधळ होऊ शकतो आणि मर्यादा कमकुवत होऊ शकतात.
advertisement
'नाही' म्हणायला शिका : जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला योग्य वाटत नसेल किंवा ती तुमच्या क्षमतेपलीकडची असेल, तेव्हा ‘नाही’ म्हणणे महत्त्वाचे आहे. 'नाही' म्हणल्याने तुम्ही स्वतःच्या भावनिक आरोग्याचे संरक्षण करता.
जास्त स्पष्टीकरण देऊ नका : तुम्ही तुमच्या मर्यादा का ठरवत आहात, यासाठी जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुमचे स्पष्टीकरण कमी शब्दांत द्या आणि तुमची भावना व गरजांवर लक्ष केंद्रित करा.
advertisement
धोक्याचे संकेत ओळखा : जर एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या मर्यादांचा अनादर करत असेल, तर हे तुमच्या नात्यात काहीतरी चुकीचे घडत असल्याचे लक्षण आहे. अशा वेळी तुम्हाला तुमचं नातं पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. कारण, मर्यादांचा नेहमी आदर व्हायला हवा.
स्वतःचा आदर करा : स्वतःवर दया आणि आदर दाखवा. यामुळे इतरांसाठी एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवले जाते. कोणत्याही नात्यात तुमच्या आत्मसन्मानाला महत्त्व देणे आवश्यक आहे.
advertisement
संयम बाळगा : नवीन मर्यादा ठरवल्यानंतर त्यांना स्वीकारण्यासाठी दोघांनाही वेळ लागतो. संयम ठेवल्याने नाती अधिक मजबूत आणि निरोगी होतात.
गरज वाटल्यास मदत घ्या : जर मर्यादा ठरवणे तुमच्यासाठी कठीण जात असेल, तर तुम्ही एखाद्या विश्वासू मित्र, समुपदेशक (Counsellor) किंवा थेरपिस्टसोबत बोलू शकता. मदत मागणे हे कमकुवतपणाचे नाही, तर सामर्थ्याचे लक्षण आहे.
advertisement
हे ही वाचा : Sleep Hygiene : मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे स्लीप हायजीन! या सवयींनी सुधारेल झोपेचे चक्र..
हे ही वाचा : Self Massage : शांत झोप आणि ताण कमी करण्यासाठी बेस्ट आहे 'ही' मसाज; पाहा पद्धत आणि फायदे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2025 10:46 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
स्वतःच्या 'मर्यादा' ओळखा अन् 'नाही' म्हणायला शिका, तरच मजबूत होईल तुमचं नातं; 'या' 10 टिप्स करतील मदत!