Tomato benefits for health : टोमॅटो खा, प्रतिकारशक्ती वाढवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
टोमॅटोमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बहुतेकदा स्वयंपाकात कोशिंबीर, भाजी, वरणात टॉमेटोचा वापर होतो, टॉमेटो सूप किंवा टॉमेटो ज्यूस हे देखील चांगले पर्याय आहेत.
Kitchen tips : पावसाळा संपलाय आणि काही दिवसांत ऑक्टोबर हिटच्या झळा सुरु होतील. अनेकांना ऋतू बदलताना ज्या प्रमाणात हवा बदलते त्याचा त्रास होतो. काहींना सर्दी-खोकला होतो, अंग दुखतं. संसर्ग पटकन होतो. अशावेळी, रोगांशी लढण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणंं खूप महत्वाचं आहे, अशा परिस्थितीत टोमॅटोचा रस पिणं फायदेशीर ठरू शकतं. मजबूत प्रतिकारशक्तीमुळे, कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन टाळणं सोपं होईल. टॉमेटो कच्चा चांगला लागतो. बहुतेकदा स्वयंपाकात कोशिंबीर, भाजी, वरणात टॉमेटोचा वापर होतो, टॉमेटो सूप किंवा टॉमेटो ज्यूस हे देखील चांगले पर्याय आहेत.
टोमॅटोमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फायबर फोलेट आणि कॅल्शियमसारखे अनेक फायदेशीर घटक असतात, जे शरीरात अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करतात. त्याचा ज्यूस नियमित प्यायल्यानं अनेक आजार दूर राहतील.
advertisement
टोमॅटो ज्यूस कसं बनवायचं ?
- 2 टोमॅटो, 1 कप पाणी,1 चिमूटभर मीठ घ्या
- सर्वप्रथम टोमॅटो पाण्यानं स्वच्छ धुवा.
- छोटे तुकडे करून ज्युसर जारमध्ये ठेवा.
- ज्युसरच्या भांड्यात एक कप पाणी घालून ४-५ मिनिटं चालवा.
- रस चांगला तयार झाल्यावर एका भांड्यात काढा.
- आता ते एका ग्लासमध्ये काढा आणि वरती मीठ घाला.
advertisement
- यानंतर तुम्ही ते पिऊ शकता
टोमॅटोचा ज्यूस पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे
1. टोमॅटो ज्यूसमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत होते.
2. याचं नियमित सेवन केल्यानं तुम्ही सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकाल.
advertisement
3. टोमॅटो ज्यूस हाडं मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
4. महिलांनी टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यानं स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
5. टोमॅटोचा ज्यूस शरीराला ऊर्जा देतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.
टॉमेटो ज्यूसमुळे, कर्करोग, मधुमेह आणि त्वचेशी संबंधित समस्यांचा प्रादुर्भाव कमी होतो,तसंच टॅनिंग कमी करण्यासाठीही टॉमेटो उपयुक्त आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 20, 2024 8:20 PM IST









