Gut Health : पोटाच्या आरोग्याचं रहस्य तुमच्या ताटात, चांगल्या पचनशक्तीसाठी आहार कसा असावा, वाचा सविस्तर

Last Updated:

गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि आम्लपित्त यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे पोट निरोगी कसं ठेवावं, कोणते पदार्थ पोट शांत करण्यास मदत करू शकतात याविषयीची ही सविस्तर माहिती.

News18
News18
मुंबई : दिवसभराच्या आहारात तुमच्या पोटात काय जातं यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होऊ शकतो.
गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि आम्लपित्त यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे पोट निरोगी कसं ठेवावं, कोणते पदार्थ पोट शांत करण्यास मदत करू शकतात याविषयीची ही सविस्तर माहिती.
फायबर: हिरव्या पालेभाज्या, पपई, सफरचंद, नाशपती यांसारखी फळं, ओट्स आणि ब्राऊन राईस आणि डाळींमधे फायबर असतं. पोटाच्या समस्या असतील तर हे पदार्थ आहारात असू द्या. पचनक्रिया योग्य राखण्यास  हे पदार्थ मदत करू शकतात.
advertisement
आलं आणि ओवा: आलं आणि ओवा यात भरपूर पोषक घटक असतात. आलं चहात किंवा कच्चंही खाऊ शकता. ओव्यातले घटक गॅस आणि पोटफुगीपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. जेवणानंतर चिमूटभर ओवा आणि काळं मीठ मिसळून खाऊ शकता.
दही: दह्यातले चांगले बॅक्टेरिया किंवा प्रोबायोटिक्स पोट स्वच्छ ठेवून पचन सुधारण्यास मदत करतात. रोज एक वाटी ताजं दही किंवा ताक पोटासाठी फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
भाज्या आणि फळं: भाज्या आणि फळं शरीरासाठी फायदेशीर असतात कारण फायबरसोबतच त्यात जीवनसत्त्वं आणि खनिजं देखील मुबलक प्रमाणात आढळतात, या दोन्हीमुळे पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.
पाणी: अनेक आरोग्य समस्यांवरचं रामबाण उत्तर म्हणजे पाणी. दररोज पुरेसं पाणी प्यायल्यानं पोट निरोगी राहतंच, शिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत होते. पाणी पित नसाल तर आजच ही सवय बदला आणि दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gut Health : पोटाच्या आरोग्याचं रहस्य तुमच्या ताटात, चांगल्या पचनशक्तीसाठी आहार कसा असावा, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement