तुम्ही प्रेग्नेंट होत नाहीत! नेमकं कारण आणि उपाय काय? डॉ. सपकाळांनी सांगितली कपलची चूक
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
सध्याला महिलांमध्ये दिवसेंदिवस एक मोठी समस्या वाढत चालली आहे. ती समस्या म्हणजेच की वंध्यत्वची समस्या. अनेक महिला या समस्याला सामोरे जात आहेत. यामागे विविध अशी कारणे आहेत.
छत्रपती संभाजीनगर: सध्याला महिलांमध्ये दिवसेंदिवस एक मोठी समस्या वाढत चालली आहे. ती समस्या म्हणजेच की वंध्यत्वची समस्या. अनेक महिला या समस्याला सामोरे जात आहेत. यामागे विविध अशी कारणे आहेत. पण या मागे काय कारणे आहेत किंवा यावर काय काळजी घेतली आपण पाहिजे याविषयी आपल्याला सविस्तर माहिती सांगितली आहे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी.
वंधत्व म्हणजे काय तर जोडप्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला गेला आहे ते बाळासाठी प्रयत्न करत आहेत आणि बाळ होत नाहीत याला आपण म्हणू शकतो. या मग विविध अशी कारणे आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली त्यामध्ये ताणतणाव आहार किंवा इतरही गोष्टींचा समावेश होतो. त्यासोबतच महिलांमध्ये आई होण्याचं वय देखील वाढत चाललं आहे. 35 नंतर आई होण्याचं प्रमाण वाढत चालले आहे आणि ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण की महिला या करिअरकडे लक्ष देतात आणि त्यामुळे वय वाढता आणि त्यानंतर या समस्या उद्भवत चाललेल्या आहेत.
advertisement
सध्याला आपला आहार देखील हा चांगला राहिलेला नाही आहे. ज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली आहे. केमिकल्स आणि हे सर्व गोष्टी आहेत. वंधत्वाची समस्या जर तुम्हाला टाळायचे असेल तर तुम्ही लवकर लग्न करून लवकर आई व्हावं म्हणजेच की तिशीचा आत मध्ये बाळ होऊ द्यावं त्यानंतर आपला आहार चांगला करावा, धूम्रपान करू नये, ताण जास्त घेऊ नये, नियमित व्यायाम करावा जर तुमचं वजन वाढलं असेल तर वजन कमी करावं आणि पार्टनर सोबत म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवावी. त्यासोबतच वारंवार गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेऊ नये. ह्या गोष्टी केल्या तर तुम्हालाही समस्या उद्भवणार नाही.
advertisement
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ही सर्व जर काळजी तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचे समस्या उद्भवणार नाही.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 27, 2025 4:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुम्ही प्रेग्नेंट होत नाहीत! नेमकं कारण आणि उपाय काय? डॉ. सपकाळांनी सांगितली कपलची चूक

