Breakfast Recipe : नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही बेस्ट! बनवा झटपट ज्वारीचे उत्तपम, पाहा सोपी रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Easy and quick maharashtrian recipes : ही रेसिपी जितकी सोपी आहे तितकीच ती हेल्दी देखील आहे. कारण आज आपण पाहात असलेली उत्तपमची रेसिपी ज्वारीपासून बनवली जाते. होय, ज्वारीपासून उत्तपम, हे बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही.
मुंबई : आज नाश्त्यासाठी काय बनवायचं आणि मुलांच्या डब्यात काय द्यायचं या प्रश्नांना रोज आपल्याला सामोरं जावं लागतं. घरातली मोठी मंडळी तरी नेहमीचे पदार्थ खातात. पण मुलांना मात्र रोज काहीतरी नवीन हवं असतं. अशावेळी आपण रेसिपी शोधातच असतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी घेऊन आलो आहोत.
ही रेसिपी जितकी सोपी आहे तितकीच ती हेल्दी देखील आहे. कारण आज आपण पाहात असलेली उत्तपमची रेसिपी ज्वारीपासून बनवली जाते. होय, ज्वारीपासून उत्तपम, हे बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही. इन्साग्रामवर chinus.kitchen_ या अकाऊंटवर ही रेसिपी सहारे केली गेली आहे. चला पाहूया ज्वारीचे उत्तपम कसे बनवायचे.
ज्वारीचा उत्तपम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- एक कप ज्वारीचे पीठ
advertisement
- अर्धा कप रवा किंवा तांदळाचे पीठ
- अर्धा कप दही
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार पाणी
- अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा इनो किंवा फ्रुट सॉल्ट
ज्वारीचा उत्तपम बनवण्याची कृती
- एका मिक्सरच्या भांड्यात ज्वारी, रवा, दही, मीठ, पाणी घालून सर्व एकजीव आणि बारीक करून घ्या.
- हे बॅटर एका भांड्यामधे काढून घ्या.
advertisement
- त्यामध्ये खायचा सोडा किंवा इनो किंवा फ्रुट सॉल्ट घाला.
- यानंतर 15 मिनिटं त्याला झाकून सेट होण्यासाठी तसेच ठेवा.
- त्यानंतर तव्यावर एल पळी बॅटर घेऊन टाका आणि दोन्ही नंजुंनी व्यवस्थित शिजवून घ्या.
- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या उत्तपमवर कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्या घालू शकता.
- तुम्हाला तिखट उत्तपम हवा असल्यास तुम्ही त्यावर तिखट मीठ आणि चाट मसालादेखील घालू शकता.
advertisement
advertisement
पाहिलंत हा उत्तम बनवणं किती सोपं आहे. तसेच हा हा उत्तपम ज्वारीचा बनलेला असल्याने तो खूप हेल्दीही आहे. मुलं ज्वारीची भाकरी खात नसतील तर तुम्ही त्यांना अशाप्रकारे हा उत्तम बनवून खाऊ घालू शकता. ते नक्कीच आवडीने खातील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 11:16 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breakfast Recipe : नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही बेस्ट! बनवा झटपट ज्वारीचे उत्तपम, पाहा सोपी रेसिपी






