Kitchen Tips : तांदूळ शिजवण्यापूर्वी धुतला नाही तर? हे का गरजेचं? भात खात असाल तर हे प्रत्येकाला माहित असायला पाहिजे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारतातील अनेक घरांमध्ये दररोज भात शिजवला जातो. पण एक प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुणं का आवश्यक आहे? आणि जर तांदूळ धुतले नाही तर?
मुंबई : भारतीय स्वयंपाकात भात हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भाताशिवाय तर अनेकांना आपलं जेवण पूर्ण झालं असंच वाटत नाही. विशेषतः बंगाली, दक्षिण भारतीय आणि कोकणातील खाद्यसंस्कृतीमध्ये तर भाताशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं.
त्यामुळे भारतातील अनेक घरांमध्ये दररोज भात शिजवला जातो. पण एक प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुणं का आवश्यक आहे? आणि जर तांदूळ धुतले नाही तर?
जसं आपण फळं-भाज्या वापरण्यापूर्वी त्यावरील धूळ-माती आणि कीटकनाशकं साफ करण्यासाठी धुतो, तसंच तांदळालाही शिजवण्याआधी नीट धुणं गरजेचं आहे. बाजारातून घरी येईपर्यंत तांदूळ अनेक हातांनी हाताळला जातो, ट्रक, पोती आणि स्टोअरमध्ये तो धूळ, रेती आणि घाण यांच्या संपर्कात येतो.
advertisement
तांदूळ न धुता शिजवल्यास काय होऊ शकतं?
जर तांदूळ नीट न धुता शिजवला गेला, तर त्यात राहिलेल्या घाणीच्याकणांमुळे अन्नातून शरीरात धूळ, बुरशी किंवा हानिकारक घटक जाऊ शकतात. दीर्घकाळ याचा संपर्क राहिला, तर पचनतंत्र बिघडू शकतं आणि विविध आजार उद्भवू शकतात.
नीट न धुतलेल्या भाताला कधी कधी एक विशिष्ट वास किंवा किंचित कडवट चव येते, जे संपूर्ण जेवणाचा अनुभव खराब करू शकतं.
advertisement
भातामध्ये स्टार्चचं प्रमाण अधिक असतं. ते धुतल्याने त्याचा बाह्य थर निघतो आणि भात शिजवताना व्यवस्थित फुलतो. जर तो धुतला नाही तर भात चिकट होतो आणि तांदूळ नीट शिजत नाही.
भात धुणं ही एक साधी कृती असली तरी ती आरोग्यासाठी, चवासाठी आणि पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्यावेळी भात शिजवण्याआधी त्याला 2–3 वेळा स्वच्छ पाण्यात धुणं विसरू नका.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पहोचवण्याचा असतो.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2025 9:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : तांदूळ शिजवण्यापूर्वी धुतला नाही तर? हे का गरजेचं? भात खात असाल तर हे प्रत्येकाला माहित असायला पाहिजे


