Taramira Oil Benefits: तारामिरा तेलाचे आहेत ‘इतके’ फायदे, ऐकून व्हाल आश्चर्यचकित ,मात्र वापरण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Taramira Oil Health Benefits in Marathi: तारामिरा तेलाला जांभा तेल किंवा अरूगुला या नावानेही ओळखलं जातं. केसांच्या वाढीपासून ते शरीराच्या अनेक व्याधी, दुखणी दूर करण्यासाठी तारामिरा तेल उपयोगी ठरतं.इतकंच काय तर हे तेल नियंत्रित प्रमाणात वापरल्यास त्वचेचा कॅन्सर होत नाही.
मुंबई: तेल हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक. पदार्थ अधिक रूचकर बनवण्यासाठी ते तेलातच तळले जातात. याशिवाय केसांच्या वाढीपासून ते सांधेदुखीची विविध औषधं तयार करण्यासाठी तेल हे उपयुक्त ठरतं. आपल्याला खोबरेल तेल, राई तेल , मोहरीचं तेल, शेंगदाणा तेल, तिळाच्या तेलाविषयी माहिती आहेच. मात्र आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत ते तारामिरा तेलाबद्दल. या तेलाला जांभा तेल किंवा अरूगुला तेल या नावानेही ओळखलं जातं. केसांच्या वाढीपासून ते शरीराच्या अनेक व्याधी, दुखणी दूर करण्यासाठी तारामिरा तेल उपयोगी ठरतं.
जाणून घेऊयात तारामिरा किंवा जांभा तेलाचे फायदे
तारामिरा म्हणजे नेमकं काय ?
या तेलाला जांभा तेल किंवा अरुगुलाचं तेल असंही म्हणतात.अरुगुलाची पानं खाता येतात आणि त्याच्या बियांपासून तेलंही काढता येतं. हे तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तारामिरा हा मोहरीचा एक प्रकार असून मोहरीप्रमाणे तारामिराचे दाणे असतात.
तारामिरा तेलाचे फायदे
advertisement
जांभा किंवा तारामिराच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलेट, जीवनसत्व अ, आणि जीवनसत्व क, असतं. मात्र भारतात ही पानं खाल्ली जात नाहीत तर त्याचं तेल काढून वापरतात.
औषधी गुणधर्म
advertisement
तारामिराच्या तेलात अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ज्यांना पुरळ, खाज किंवा अन्य त्वचाविकार आहेत त्यांच्यासाठी हे तेल फायदेशीर ठरतं. याशिवाय एखाद्या जखमेवर तारामिराचं तेल लावण्याने ती जखम लवकर भरून यायला मदत होते. तारामिरा तेलात दाहक विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे डोकेदुखी,अंगदुखी इत्यादी आजारांवर हे तेल गुणकारी ठरू शकतं. या तेलाने शरीराला मसाज केल्याने थकवा दूर होतो.
advertisement
त्वचेसाठी फायद्याचं
तारामिरा तेलामध्ये अँटिमेलानोमा आणि अँटीम्युटेजेनिक गुणधर्म आहेत. यामुळे हे तेल शरीरावर लावल्यास कॅन्सरच्या पेशी तयार होत नाही. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरसारखे गंभीर आजार रोखण्यासाठी तारामिरा तेल फायद्याचं ठरतं. तारामिरा तेलाच्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे त्वचेचीजळजळ थांबू शकते. शिवाय हे तेल सोरायसिस सारख्या आजारांवर गुणकारी ठरतं. तारामिरा तेल लावल्यामुळे चेहऱ्यावरच्या मुरुमांची समस्या देखील दूर होऊ शकते.
advertisement
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर
कोंडा किंवा उवा लिखांच्या त्रासावर हे तेल गुणकारी ठरतं. मात्र या तेलाचा वापर करताना योग्य प्रमाणातच करण्याा सल्ला तज्ज्ञ देतात . शिवाय तेल लावल्यानंतर शॅम्पूने केस धुवायला विसरू नका.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2024 1:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Taramira Oil Benefits: तारामिरा तेलाचे आहेत ‘इतके’ फायदे, ऐकून व्हाल आश्चर्यचकित ,मात्र वापरण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी