advertisement

बदाम खा, पण आधी योग्य पद्धत तर जाणून घ्या, नाहीतर कसे मिळतील फायदे?

Last Updated:

काहीजणांना हेच कळत नाही की, बदाम आहेत तसे खावे, साल काढून खावे की भिजवून खावे? त्यामुळे याबाबत डॉक्टर काय सांगतात पाहूया.

बदामांमधून शरिराला मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळतात.
बदामांमधून शरिराला मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळतात.
नालखेश्वर यादव, प्रतिनिधी
जांजगीर चांपा : बदामातून शरिराला अनेक पोषक तत्त्व मिळतात, म्हणूनच बदामांना पोषक तत्त्वांचा खजिना म्हटलं जातं. यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि गूड कोलेस्ट्रॉल असतं. बदामांमुळे हाडं मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शिवाय सुदृढ हृदयासाठी आणि सुरळीत पचनक्रियेसाठी बदाम उपयुक्त असतात. त्यामुळे जगभरात अनेकजण बदाम खातात, परंतु बहुतेकजणांना ते खाण्याची योग्य पद्धतच माहित नसते. मग बदामांचे फायदे मिळणारच कसे...
advertisement
काहीजणांना हेच कळत नाही की, बदाम आहेत तसे खावे, साल काढून खावे की भिजवून खावे? त्यामुळे याबाबत डॉक्टर काय सांगतात पाहूया. आयुर्वेदिक डॉक्टर फणींद्र भूषण दीवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदामांमधून शरिराला मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळतात, त्यामुळे शरीर छान ऊर्जावान राहतं. शिवाय यात असलेल्या गूड कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. तसंच यातील फायबरमुळे पोटात कोणत्याही पदार्थाचं पचन व्यवस्थित होतं.
advertisement
नेमके कसे खावे बदाम?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 5 ते 10 बदाम पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी साल काढून हे बदाम खावे. आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत असाल तर त्याआधी बदाम खाऊ शकता. या बदामांची संख्या 15 ते 20 असावी. बदाम आपण वर्षाचे बारा महिने खाऊ शकता.
advertisement
थंड वातावरणात आपली पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे त्यासाठी बदाम खाण्याची आवश्यकता नाही, मात्र या काळात शरिराला भरपूर प्रोटीन्सची गरज असते. त्यासाठी तुम्ही बदाम खाऊ शकता. ते ही प्रोटीनची कमी भरून काढण्यास उपयुक्त ठरतील.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बदाम खा, पण आधी योग्य पद्धत तर जाणून घ्या, नाहीतर कसे मिळतील फायदे?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement