Wedding Shopping : लग्नसराईसाठी करा मनसोक्त खरेदी, फक्त 1200 रुपयांपासून मिळतोय लेहेंगा सेट, मुंबईत हे आहे लोकेशन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
लग्नसराईला सुरुवात झाली आहे. यानंतर मेहंदी, हळदी आणि लग्न समारंभांची लगबग सुरू झाली असून, त्यासोबतच शॉपिंगलाही वेग आला आहे.
मुंबई: दिवाळी झाली, तुळशीविवाहही पार पडला आणि 2 नोव्हेंबरला चातुर्मास संपल्यानंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली आहे. यानंतर मेहंदी, हळदी आणि लग्न समारंभांची लगबग सुरू झाली असून, त्यासोबतच शॉपिंगलाही वेग आला आहे. तर याचनिमित्ताने मालाडमधील नटराज मार्केटजवळ असलेल्या बीएमसी मार्केटमध्ये निधी फॅशन हे दुकान विशेष लक्ष वेधून घेत आहे. येथे फक्त 1200 रुपयांपासून हेवी ड्रेस आणि लेहेंगा सेट मिळत आहेत.
निधी फॅशनचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे दर स्वस्त आणि डिझाईन्स ट्रेंडी आहेत. लग्न, साखरपुडा, हळदी किंवा रिसेप्शनसाठी योग्य असे पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचे ड्रेस येथे मिळतात.
ट्रेडिंग ड्रेस आणि पॅटर्न्स
1) मिरर वर्क असलेला लेहेंगा सेट
2) हेवी झरी आणि धाग्याचं काम असलेला लाँग गाऊन
3) सिक्वेन्स वर्क असलेला लेहेंगा-चोळी सेट
advertisement
4)फुलांच्या प्रिंटचा वन पीस ड्रेस
5) जॉर्जेट अनारकली गाऊन
6) फ्रिल डिझाईन असलेला पार्टीवेअर गाऊन
7) गरारा सेट
8) रेडीमेड सारी कम ड्रेस
हे आणि असे बरेच पॅटर्न्स असलेले ड्रेस इथे मिळतात. तसंच या संपूर्ण मार्केट मध्ये सुद्धा अशा नवीन डिझाईन्सचे आणि ट्रेडिंग पॅटर्नचे ड्रेस मिळतायत. पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारचे ड्रेस मिळतात. लग्न, साखरपुडा, हळदी किंवा रिसेप्शनसाठी हे ड्रेस महिलांमध्ये खूप लोकप्रिय ठरत आहेत.
advertisement
दिवाळीनंतर सुरू झालेल्या लग्नाच्या हंगामात, कमी किमतीत आकर्षक पोशाख घ्यायचे असतील तर मालाडचं नटराज मार्केट , बीएमसी मार्केट इथे खरेदी करू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 3:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Wedding Shopping : लग्नसराईसाठी करा मनसोक्त खरेदी, फक्त 1200 रुपयांपासून मिळतोय लेहेंगा सेट, मुंबईत हे आहे लोकेशन

