Laptop Clean Tip : लॅपटॉपची स्क्रीन साफ कशी करायची? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंबई : आजच्या डिजिटल युगात लॅपटॉप आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आता प्रतयेकाला काम करण्यासाठी लॅपटॉप हा लागतोच. पण त्याच्या सतत वापरामुळे त्याच्या स्क्रीनवर धूळ, बोटांचे ठसे आणि डाग रहातात, ज्यामुळे दिसण्यात अडथळा निर्माण होतो आणि वापरण्याचा अनुभवही खराब होतो. योग्य काळजी आणि स्वच्छतेच्या काही सोप्या पद्धती वापरून आपण लॅपटॉपची स्क्रीन सुरक्षितपणे स्वच्छ ठेवू शकतो.
स्क्रीन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
स्क्रीन साफ करण्यापूर्वी सर्वप्रथम लॅपटॉप पूर्णपणे बंद करा आणि वीजपुरवठ्यापासून वेगळा करा. जर लॅपटॉप नुकताच वापरलेला असेल, तर तो थंड होऊ द्या.
हलकी धूळ किंवा फिंगरप्रिंट्स काढण्यासाठी मायक्रोफायबर कपडा सर्वात योग्य असतो. जर हट्टी डाग दिसत असतील, तर डिस्टिल्ड वॉटर (शुद्ध पाणी) हलक्याने ओलसर करून पुसा.
advertisement
कोपऱ्यांमध्ये साचलेली धूळ काढण्यासाठी एअर कंप्रेसरचा वापर करता येतो, मात्र खूप जवळून किंवा जास्त दाब देऊन नाही. आवश्यक असल्यास क्लिनिंग वाइप्स वापरू शकता, पण त्या हार्ड केमिकलविरहित असाव्यात.
स्वच्छता झाल्यानंतर स्क्रीन पूर्णपणे कोरडी होऊ द्या आणि मगच लॅपटॉप सुरू करा.
स्वच्छतेवेळी टाळायच्या चुका
पेपर टॉवेल, टिश्यू पेपर किंवा खडबडीत कपडा वापरणे टाळा यामुळे स्क्रीनवर ओरखडे पडू शकतात.
advertisement
अल्कोहोल किंवा अमोनिया बेस्ड क्लीनर वापरू नका, कारण ते स्क्रीनची प्रोटेक्टिव्ह लेयर नष्ट करू शकतात.
कधीही लिक्विड थेट स्क्रीनवर स्प्रे करू नका. हे द्रव आत शिरून इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खराब करू शकते.
स्क्रीन स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स
लॅपटॉप बंद करताना स्क्रीन आणि कीबोर्डच्या मध्ये पातळ मायक्रोफायबर कपडा ठेवा.
लांब काळ वापरणार नसल्यास लॅपटॉप केसमध्ये झाकून ठेवा.
advertisement
लॅपटॉपजवळ खाणं-पिणं टाळा आणि शक्यतो स्क्रीनला वारंवार स्पर्श करू नका.
लॅपटॉप स्क्रीन ही अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे तिच्या स्वच्छतेसाठी नेहमी सौम्य पद्धती वापरणं गरजेचं आहे. योग्य काळजी घेतल्यास तुमचा लॅपटॉप फक्त सुंदरच नाही, तर दीर्घकाळ टिकूनही राहील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Laptop Clean Tip : लॅपटॉपची स्क्रीन साफ कशी करायची? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक


