advertisement

Success Story : कॉर्पोरेट नोकरीला केला रामराम, सुरू केला जेकेटीज पॅनविच व्यवसाय, खुशबू यांची कहाणी

Last Updated:

खुशबू यांनी आपली नोकरी सोडून जेकेटीज पॅनविच या नावाने स्वतःचा पॅनविच व्यवसाय सुरू केला असून, आज त्या चांगला नफा मिळवत यशस्वी उद्योजिका ठरत आहेत.

+
News18

News18

पुणे : एअर-कंडिशन्ड कंपनी, चांगला पगार आणि कॉर्पोरेट जीवनशैली सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस फार थोडे लोक करतात. मात्र पुण्यातील खुशबू पटवा यांनी हे धाडस करून दाखवले आहे. ब्रँड कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या खुशबू यांनी आपली नोकरी सोडून जेकेटीज पॅनविच या नावाने स्वतःचा पॅनविच व्यवसाय सुरू केला असून, आज त्या चांगला नफा मिळवत यशस्वी उद्योजिका ठरत आहेत.
खुशबू यांना व्यवसाय करण्याची आवड आधीपासूनच होती. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे घरीच राहावे लागल्याने त्यांनी आपल्या आवडीचा उपयोग करून वेगवेगळ्या पॅनविच रेसिपी तयार करण्यास सुरुवात केली. या रेसिपी कुटुंबीय आणि मित्रमंडळींना खूप आवडल्या. त्यानंतर आपण हे व्यावसायिक पातळीवर का करू नये? असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी पहिल्यांदा औंध परिसरात छोटा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सुरुवातीला त्यांनी नोकरी आणि व्यवसाय दोन्ही सांभाळले. ऑफिस करून त्या रात्री दोन ते तीन तास औंधमध्ये पॅनविचचा स्टॉल लावत असत. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला. अनेक ग्राहक पुन्हा-पुन्हा येऊ लागले, ज्यामुळे आत्मविश्वास अधिक बळकट झाला. लोकांना आपला पदार्थ आवडतोय, आपण हे पुढे नेऊ शकतो, याची जाणीव झाल्यानंतर 2024 मध्ये त्यांनी पूर्णवेळ नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
advertisement
यानंतर खुशबू यांनी पाषाण-सुस रोड परिसरात जेकेटीज पॅनविच नावाने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दोन ते तीन खास रेसिपी होत्या, ज्यामध्ये क्लासिक जेकेटी ही त्यांची सिग्नेचर रेसिपी ठरली. आज त्यांच्या व्यवसायात पाच वेगवेगळ्या प्रकारचे पॅनविच उपलब्ध आहेत. फ्ली मार्केट, विविध इव्हेंट्स आणि प्रदर्शनांमध्येही त्या स्टॉल लावत होत्या.
या संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे खुशबू सांगतात. व्यवसाय करताना अनेक चढ-उतार आले, अडचणीही आल्या, पण हार न मानता त्यांनी सातत्य ठेवले. कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे त्यांचे धाडस आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : कॉर्पोरेट नोकरीला केला रामराम, सुरू केला जेकेटीज पॅनविच व्यवसाय, खुशबू यांची कहाणी
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement