Hair loss Reasons: बापरे! ऐकावं ते नवलंच; ‘या’ कारणांमुळे सुद्धा होऊ शकते केसगळती, महिलांसह पुरूषांना देखील घ्यावी लागणार काळजी

Last Updated:

Tips to prevent hair loss at home in Marathi: पाणी बदलामुळे नाही तर खराब गुणवत्तेच्या पाण्यामुळे केसगळचीचा त्रास होऊ शकतो. पाणी हे दिसायला जरी स्वच्छ असलं तरीही त्यात असलेल्या विविध घटक मर्यादेपेक्षा जास्त असतील तर असं पाणी तुमच्या एकूणच आरोग्यासाठी धोक्याचं आहे.

प्रतिकात्मक फोटो : बापरे! ऐकावं ते नवलंच; ‘या’ कारणांमुळे सुद्धा होऊ शकते केसगळती, महिलांसह पुरूषांना देखील घ्यावी लागणार काळजी
प्रतिकात्मक फोटो : बापरे! ऐकावं ते नवलंच; ‘या’ कारणांमुळे सुद्धा होऊ शकते केसगळती, महिलांसह पुरूषांना देखील घ्यावी लागणार काळजी
मुंबई : ‘हेअर लॉस’ आजच्या धकाधकीच्या जीवनातला एक नवा आजार किंवा एक नवी डोकेदुखी. असं नाहीये की, केस गळतीचा त्रास हा फक्त महिलांनाच होतो. केस गळतीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक पुरूषांना अकाली टक्कल पडलंय. आजच्या काळात केस गळण्याची समस्या ही खूपच सामान्य झालीये. तरुण असो वा वृद्ध, सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना या समस्येचा त्रास होतोय. केसगळतीमुळे महिलांना नैराश्येचा सामना करावा लागतोय. तर पुरूषांना मानसिक चिंतेनं ग्रासलंय. केस गळतीची अनेक कारणं असू शकतात. मात्र तुम्ही घर बदलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलात आणि जर तुम्हाला केस गळतीचा त्रास सुरू झाला तर अंघोळीसाठी वापरलं जात असलेल्या पाण्यामुळे केस गळतात असं अनेकांना वाटतं. मात्र हे खरं आहे का ? जाणून घेऊयात तज्ज्ञांकडून
श्रीबालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सल्लागार आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल यांच्या मते, केस कमकुवत होवून ते गळून पडण्यासाठी पाणी हे कारणीभूत असू शकतं. मात्र पाण्यातल्या बदलामुळे नाही तर खराब गुणवत्तेच्या पाण्यामुळे केस गळण्याचा त्रास होऊ शकतो. पाणी हे जरी स्वच्छ दिसत असलं तरीही त्यात क्लोरीनचं प्रमाण हे अपेक्षेपेक्षा जास्त असेल किंवा त्याची pH लेव्हल ही जास्त असेल तर असं पाणी हे फक्त तुमच्या केसांसाठीच नाही तर एकूणच आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं. क्लोरिनशिवाय पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या धातूंचं प्रमाण जास्त असेल तर ते पाणी सुद्धा केसांसाठी धोक्याचं ठरू शकतं. याशिवाय तुम्ही वापरत असलेल्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण तर ते केसगळतीचं कारण ठरू शकतं. यामुळे केसांच्या मुळांना नुकसान होऊन केसगळतीला सुरूवात होऊ शकते. शिवाय अशा पाण्याने अंघोळ केल्यामुळे टाळूतला ओलावा नाहीसा होऊन केस कोरडे पडायला सुरूवात होते.
advertisement
जर तुम्ही घर बदललं असेल किंवा तुमच्या पाण्यात झालेल्या बदलामुळे केसगळतीचा त्रास सुरू झाला असेल तर या टिप्स् वापरून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.

केसगळती रोखण्यासाठी उपाय

  • केसांना मजबुती येण्यासाठी भरपूर पोषक तत्त्वं असलेला आहार घ्या. तुमच्या आहारात जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि खनिजं असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे अन्नातून केसांना पोषक तत्त्वं मिळून केसांना मजबूती येईल आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होईल.
  • हिवाळ्यात थंडीमुळे किंवा खराब गुणवत्ता असलेल्या पाण्यामुळे केस कोरडे पडतात. त्यामुळे केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.यामुळे केस तुटण्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
  • आठवड्यातून एकदा बदाम, आवळा किंवा खोबरेल तेलाने केसांना चांगली मॉलिश करा. हे तेल केसांच्या मुळापर्यंत जाईल याची काळजी घ्या. तेलाच्या मॉलिशमुळे केसांची मुळं तर मजबूत होतीलच मात्र त्यांचा ओलावाही टिकून राहील.
  • पाणी शुद्ध करण्यासाठी आर ओ फिल्टर किंवा सॉफ्टनर वापरा. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारून केसांचं आरोग्य अबाधित राहील.
  • तुमच्या घरात असलेली पाण्याची टाकी किंवा सोसायटीमध्ये असलेली मुख्य पाण्याची टाकी ठराविक वेळेत स्वच्छ होईल याची काळजी घ्या. जेणेकरून स्वच्छ पाणी शरीरासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair loss Reasons: बापरे! ऐकावं ते नवलंच; ‘या’ कारणांमुळे सुद्धा होऊ शकते केसगळती, महिलांसह पुरूषांना देखील घ्यावी लागणार काळजी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement