हिवाळ्यात का उद्भवते केस गळण्याची समस्या? यामागचं नेमकं कारण काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लोकांच्या कोणत्याच गोष्टी वेळेवर होत नाहीत. ना झोप, ना जेवण, ना नाष्टा. ज्याचा परिणाम शरीरावर होतो. ज्यामुळे आपले केस देखील कमकूवत होऊ लागतात.
मुंबई, 20 डिसेंबर : हिवाळ्यात केस तुटणे खूप सामान्य आहे. अनेक महिला याला बळी पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे अव्यवस्थित दिनचर्या. आजच्या धावपळीच्या जीवनात, लोकांच्या कोणत्याच गोष्टी वेळेवर होत नाहीत. ना झोप, ना जेवण, ना नाष्टा. ज्याचा परिणाम शरीरावर होतो. ज्यामुळे आपले केस देखील कमकूवत होऊ लागतात.
यामुळेच केवळ तरुणच नाही तर आजकाल सर्व वयोगटातील लोक केस गळण्याने त्रस्त असतात. थंडीच्या दिवसात कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढते. ही देखील याची काही कारणे आहेत.
हिवाळ्यात त्वचा आणि टाळू कोरडे होतात, त्यामुळे केसांमध्ये पोषणाची कमतरता असते, हे केस गळण्याचे प्रमुख कारण आहे.
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे
थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे खूप सामान्य आहे, जे केसांसाठी चांगले नाही. गरम पाणी थेट डोक्यावर पडल्यास टाळूलाही इजा होते. यामुळे टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोंडा यासारख्या समस्या उद्भवतात.
advertisement
गरम पाणी केसांमधले नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण वाढते.
थंडीत लांब अंतराने आंघोळ करावी
असे बरेच लोक आहेत जे थंडीत अंघोळ करत नाहीत किंवा अनेक दिवसांच्या अंतराने अंघोळ करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की थंडीत आंघोळ न केल्याने डोक्यातील कोंडा वाढतो, ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि टाळूमध्ये खाज सुटणे आणि जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
advertisement
त्यामुळे हिवाळ्यात केसगळती टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. हे उपाय केसांना पोषण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 20, 2023 7:45 AM IST