हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स

Last Updated:

हिवाळ्यात केस गळणे, केस तुटणे, डॅमेज होणे किंवा डँड्रफ सारख्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात.

+
हिवाळ्यात

हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स

वर्धा, 3 डिसेंबर: हिवाळ्यात अनेकांना केस गळतीसह इतर समस्यांना सामोरे जावे लागते. केस गळणे, केस तुटणे, डॅमेज होणे किंवा डँड्रफ या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. मात्र त्यावर घरगुती सोपे उपाय केल्यास या समस्येतून मुक्ती मिळेल. याबाबतच वर्धा येथील सौंदर्य तज्ज्ञ साक्षी भुते यांनी माहिती दिली असून खोबरेल तेला सोबत काही वस्तू ऍड केल्यास केसांच्या समस्यांवर मात करता येते.
खोबरेल तेलात ऍड करा या वस्तू
हिवाळ्यात केस गळतीचे प्रमाण वाढलेले अनेक जण अनुभवतात. त्यामुळे खोबरेल तेलात एरंडेल तेल ऍड करून लावल्यास अराम मिळू शकतो. तसेच कोकोनट ऑइलमध्ये कलौंजी, मेथीचे दाणे, कढिपत्ता, जास्वंद फुल, कांदाही ऍड करू शकता. आता हे सगळं तेलात उकळून तेल गाळून ठेवायचे आणि उरलेला पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन हेयर पॅक म्हणूनही वापरू शकता. हे तेल आठवड्यातून शक्यतो दोनदा लावावे, असे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.
advertisement
असा करा हेयर वॉश
केसांना धुवत असताना डायरेक्ट शाम्पू लावण्याची सवय सोडली पाहिजे. थोड्या पाण्यात शाम्पू ऍड करून नंतर त्याने केस धुवायला पाहिजे. हा पाण्यात मिसळलेला शाम्पू फक्त टाळूला लावून डोकं स्वच्छ केलं पाहिजे. जेणेकरून केस आपोआप स्वच्छ होतील. कोंडा गायब होईल आणि केसगळतीही थांबेल. शांपू पूर्ण केसांना लावण्याची गरज नाही. त्याने केस डॅमेज होऊ शकतात. केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर खोबरेल तेलामध्ये भीमसेन कापूर ऍड करून हे तेल केसांना लावलं तर चांगलं राहतं, असा सल्लाही सौंदर्यतज्ज्ञ साक्षी भुते देतात.
advertisement
हिवाळा म्हंटलं की वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम किंवा केसांच्या समस्या उदभवतात. त्यामुळे वरील काही घरगुती टिप्स फॉलो करून आपल्याला या समस्यांवर मात करता येते.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement