Makar Sankranti 2025: हलव्याच्या दागिन्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य, मुंबईजवळ मिळतात अत्यंत आकर्षक, सुबक! Address
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Makar Sankranti Festival Shopping : मकर संक्रांतीला जेवढं महत्त्व तिळाच्या लाडवांना, पतंगांना आहे, तेवढंच महत्त्व असतं हलव्याच्या दागिन्यांना. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर हे दागिने अगदी शोभून दिसतात. मुंबईजवळ सर्वात सुंदर हलव्याचे दागिने कुठे मिळतात पाहूया.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : वर्षातला पहिला सण अर्थात 'मकर संक्रांत' (Makar Sankranti) जवळ आली आहे. या दिवशी जेवढं महत्त्व तिळाच्या लाडवांना, पतंगांना आहे, तेवढंच महत्त्व असतं हलव्याच्या दागिन्यांना. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर हे दागिने अगदी शोभून दिसतात. मुंबईजवळ सर्वात सुंदर हलव्याचे दागिने कुठे मिळतात पाहूया.
अनेकजण शॉपिंगसाठी ठाण्याला जातात. इथंच परवडणाऱ्या दरात आकर्षक असे हलव्याचे दागिने मिळतात. ठाण्यात अनिता नाईक या मागील अनेक वर्षांपासून हलव्यांच्या दागिन्यांचा व्यवसाय करतात. या घरगुती व्यवसायात त्यांच्या मदतीला अनेक महिलाही आहेत. सर्वजणी मिळून अतिशय देखणे दागिने बनवतात. त्यांच्याकडे नव्या नवरीसाठी लागणारे नाजूक, भरजरी हलव्याचे दागिने मिळतातच, शिवाय जावयांसाठीदेखील सर्व ट्रेंडिंग हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. ठाणेकर या दागिन्यांची खरेदी इथून करतातच, शिवाय मुंबईकरदेखील याठिकाणी आवर्जून खरेदीसाठी येतात.
advertisement
विशेष म्हणजे इथं केवळ एकाच डिझाइनचे हलव्याचे दागिने मिळत नाहीत, तर प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार दागिन्यांची खरेदी याठिकाणी करता येऊ शकते. जर कोणाला गळ्यात फार दागिने घालायला आवडत नसतील, तर त्यांच्यासाठी एक सुंदर मोठा, आकर्षक असा छल्ला आहे. तसंच गळ्यात घालायला नाजूक असा कंठीहार आहे, त्यातही व्हरायटी मिळतील.
अनिता नाईक यांच्याकडे मिळणारं हलव्याचं मंगळसूत्र फार प्रसिद्ध आहे. खास ते खरेदी करण्यासाठी अनेकजणी येतात. तसंच कानातले, नथ, बांगड्या, असे पूर्ण हलव्याचे सेट इथं मिळतात. किंमत सुरू होते फक्त 300 ते 350 रुपयांपासून. तसंच जावयांसाठी गळ्यात एक साधी, सुंदर हलव्याची माळ इथं उपलब्ध आहे. ज्या लहान बाळांची ही पहिलीच मकर संक्रांत असेल त्यांच्यासाठीदेखील इथं खास हलव्याचे इटुकले पिटुकले दागिने मिळतील. त्यांच्यासाठी मुकूट, माळ असं सगळंकाही मिळेल. तसंच हलव्याची छोटूशी बासरीसुद्धा इथं आहे. बाळासाठीच्या सेटची किंमतही सुरू होते 300 ते 350 रुपयांपासून.
advertisement
तुम्हालासुद्धा यंदाच्या मकर संक्रांतीसाठी रेखीव, आकर्षक असे सुंदर, सुबक हलव्याचे दागिने खरेदी करायचे असतील, तर अनिता नाईक यांच्याकडून नक्कीच घेऊ शकता. ठाणे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या राघोबा रोडवरील नाईक हाऊसमध्ये आपण ही खरेदी करू शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
January 07, 2025 11:28 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makar Sankranti 2025: हलव्याच्या दागिन्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य, मुंबईजवळ मिळतात अत्यंत आकर्षक, सुबक! Address