मुगाच्या डाळीचे सूप, वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यातील उत्तम पर्याय, घरच्या घरी असं करा तयार
- Published by:Devika Shinde
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
आपल्या दैनंदिन जीवनात आणि जेवणात डाळ तसेच डाळींचे पदार्थ खाण्याला महत्व अनेक आहे. सर्वच डाळी ह्या आपल्या आरोग्यासाठी आणि आहारासाठी पोषक असतात
कुणाल दंडगव्हाळ - प्रतिनिधी, नाशिक : आपल्या दैनंदिन जीवनात आणि जेवणात डाळ तसेच डाळींचे पदार्थ खाण्याला महत्व अनेक आहे. सर्वच डाळी ह्या आपल्या आरोग्यासाठी आणि आहारासाठी पोषक असतात पण हिवाळ्यात मुगाची डाळ खाण्याला विशेष महत्व आहे. मुगाच्या डाळीत काॅपर, फोलेट, विटेमिन c , b असे अनेक 6 जीवनसत्व आहेत.
आपल्या दैनंदिन आहारात डाळींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक डाळ आरोग्यासाठी फायदेशीर असून, हिवाळ्यात मुगाच्या डाळीला विशेष स्थान आहे. मुग डाळीत तांबे (Copper), फोलेट, व्हिटॅमिन C आणि B यांसारखी जीवनसत्त्वे तसेच फायबर असते. हे फायबर आतड्यांतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरते.
जर वजन कमी करण्याचे उद्दिष्ट असेल, तर दररोजच्या आहारात मुग डाळीचा समावेश नक्कीच फायदेशीर ठरेल. चला, शुभांगी राजस यांच्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या मुगाच्या डाळीच्या सूपची रेसिपी पाहूया.
advertisement
मुगाच्या डाळीचा सूप तयार करण्यासाठी साहित्य:
एक वाटी भिजवलेली मुग डाळ
एक हिरवी मिरची
7-8 लसूण पाकळ्या
थोडा आले
कोथिंबीर
एक चमचा गाईचे तूप
काळं मीठ
जिरे
तीळ
एक लिंबू
रेसिपी:
डाळ भिजवणे व वाटणे:
भिजवलेल्या मुग डाळीला मिक्सरमध्ये एकजीव वाटून घ्या. वाटताना मिरची आणि आले घालावे. सूप घट्ट किंवा पातळ हवे असल्यास त्यानुसार पाणी मिसळा.
advertisement
फोडणी तयार करणे:
एका कढईत गाईचे तूप गरम करा. त्यात लसूण तळून सोनेरी होईपर्यंत फ्राय करा. थोडा लसूण बाजूला काढून ठेवा. मग फोडणीसाठी जिरे घालून त्यात वाटलेले डाळीचे मिश्रण टाका.
शिजवणे:
मिश्रण मध्यम आचेवर 5-7 मिनिटे शिजू द्या. त्यात काळं मीठ घालून झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या. गॅस बंद झाल्यावर चवीप्रमाणे लिंबाचा रस मिसळा.
advertisement
गार्निश:
तयार सूपवर भाजलेले तीळ, तळलेला लसूण आणि कोथिंबीर भुरभुरवा.
तुमचे पौष्टिक, स्वादिष्ट मुगाच्या डाळीचे सूप तयार आहे.
मुग डाळ खाण्याचे फायदे:
वजन कमी करणे:
मुगाच्या डाळीत कमी कॅलरी असल्याने वजन नियंत्रित राहते. सूप, वरण, किंवा मोड आलेल्या मूग डाळीची उसळ खाणे फायदेशीर ठरते.
ऊर्जा प्रदान करणे:
डाळीत असलेले लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि प्रथिने शरीरातील अशक्तपणा दूर करून दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2024 3:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुगाच्या डाळीचे सूप, वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यातील उत्तम पर्याय, घरच्या घरी असं करा तयार