Ginger Garlic Paste : फक्त 15 मिनिटात बनवा आलं-लसूण पेस्ट, 2 महीने राहील फ्रेश; पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
रोज थोडी थोडी आलं लसूण पेस्ट बनवणं खूप कंटाळवाणं काम असतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आलं लसूण पेस्ट बनवण्याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही पेस्ट बनवल्यास ती तब्बल 2 महिने टिकू शकते.
मुंबई : भाजी-चपाती-वरण-भात असा बहुतांश भारतीयांचा रोजचा आहार असतो. भाजी आणि वरण बनवताना त्यात आलं लसणाची पेस्ट वापरली जाते. यामुळे त्याला आणखी छान चव येते. मात्र रोज थोडी थोडी आलं लसूण पेस्ट बनवणं खूप कंटाळवाणं काम असतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आलं लसूण पेस्ट बनवण्याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही पेस्ट बनवल्यास ती तब्बल 2 महिने टिकू शकते.
व्यस्त शेड्युलमुळे तुम्हाला रोज घरी आले लसूण पेस्ट बनवता येत नसेल आणि ती बाजारातून विकत घेण्याची तुमची इच्छा नसेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. देशातील पहिल्या होमशेफ आणि कुक बुक लेखक तरला दलाल यांनी आले लसूण पेस्टची अप्रतिम रेसिपी दिली आहे. हे फक्त 15 मिनिटांत सहज तयार करता येते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते डीप फ्रीजरमध्ये 2 महिन्यांपर्यंत साठवले जाऊ शकते. आलं लसूण पेस्ट घरी कशी बनवायची ते जाणून घ्या.
advertisement
आले लसूण पेस्टसाठी लागणारे साहित्य..
तरला दलालच्या रेसिपीमधून आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 3 मुख्य घटकांची आवश्यकता असेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह किंवा फूड कलर वापरले जाणार नाही. आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला 1 कप सोललेला लसूण, 1/2 कप जाडसर किसलेलं आलं, 1 टीस्पून मीठ एवढे साहित्य लागेल.
अशी बनवा आलं लसूण पेस्ट..
आलं लसूण पेस्ट घरी बनवण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, तुम्हाला बाजारातील प्रिझर्व्हेटिव्ह असलेली आलं लसूण पेस्ट वापरण्याची गरज नाही. दुसरे म्हणजे, आलं लसूण पेस्ट घरी बनवल्याने जेवणाची चवही वाढते.
advertisement
- आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाका.
- 1/2 चमचे पाणी वापरून साहित्य बारीक करा.
- आलं लसूण पेस्ट एअर टाईट डब्यात भरा. तुम्ही ते 1 आठवड्यासाठी फ्रीजमध्ये आणि 2 महिन्यांसाठी डीप फ्रीजरमध्ये साठवू शकता.
(तुमची इच्छा असल्यास आलं लसूण पेस्ट बनवताना तुम्ही 1 टीस्पून तेल देखील घालू शकता. ही एक पूर्णपणे पर्यायी स्टेप आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 14, 2024 10:48 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ginger Garlic Paste : फक्त 15 मिनिटात बनवा आलं-लसूण पेस्ट, 2 महीने राहील फ्रेश; पाहा रेसिपी