Male Contraceptive Methods : फक्त कंडोमच नाही, पुरुषांसाठी हे आहेत गर्भनिरोधकाचे 7 सुरक्षित पर्याय!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
कंडोम ही पुरुषांसाठी एकमात्र गर्भनिरोधक पद्धत नाही. अशा अनेक पद्धती आहेत, ज्याद्वारे पुरुष जन्म नियंत्रणाचा पर्याय वापरू शकतात. चला जाऊन घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.
मुंबई, 27 सप्टेंबर : सामान्यतः लोकांना गर्भनिरोधक म्हणजे कंडोम किंवा महिलांच्या गर्भनिरोधक गोळ्या एवढेच पर्याय असतात असे वाटते. गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक दुष्परिणाम समोर आल्यानंतर त्यांचा वापर कमी होऊ लागला आहे. परंतु पुरुषांसाठी गर्भनिरोधक म्हणून कंडोम हा एकमेव पर्याय नाही, हे बहुतांश लोकांना माहीत नाही. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल सर्वकाही.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामांमुळे शास्त्रज्ञ पुरुष गर्भनिरोधकांच्या अनेक पद्धतींवर काम करत आहेत. दुसरीकडे पुरुष गर्भनिरोधक अधिक महत्वाचे आहे. कारण महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि त्यांना गर्भनिरोधक गोळ्या किंवा इंजेक्शन्सपासून दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असतो. चला तर मग पुरुष गर्भनिरोधकांचे किती प्रकार आहेत ते जाणून घेऊया.
पुरुष गर्भनिरोधक पद्धती
1. कंडोम : वेबएमडीच्या अहवालानुसार, पुरुष कंडोम ही निश्चितपणे जगभरातील गर्भनिरोधकाची सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे. कंडोमसह गर्भनिरोधक होण्याची शक्यता 98 टक्क्यांपर्यंत आहे. दुसरीकडे ते लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका देखील कमी करते. मात्र कंडोमची गुणवत्ता कमकुवत असल्यास गर्भनिरोधकामध्ये अडचणी येऊ शकतात.
advertisement
2. स्पर्मीसाइड : नावावरूनच हे समजू शकते की, या गर्भनिरोधक पद्धती शुक्राणू नष्ट करतात. शुक्राणुनाशक म्हणजे शुक्राणू मारणे. शुक्राणूनाशक एक नॉन-ऑक्सिनॉल-9 संयुग आहे जे शुक्राणूंना मारते, ज्यामुळे गर्भधारणा रोखते. शुक्राणूनाशक अनेक स्वरूपात उपलब्ध आहे. हे फोम, जेली, टॅब्लेट, क्रीम, सपोसिटरी आणि डिझॉल्व्ह फिल्म या स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. आपल्या देशात त्याचा कमी वापर होत असला तरी पाश्चिमात्य देशांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
advertisement
3. स्पर्मीसाइड कंडोम : हे नेहमीच्या कंडोमसारखे असते, परंतु ते नॉन-ऑक्सिनॉल-19 कंपाऊंडसह लेपित केलेले असते. हे एक प्रकारे वंगण म्हणूनही काम करते. जन्म नियंत्रणासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मात्र UTI संसर्गाचा काही धोका आहे.
4. वेस्कोटोमी किंवा पुरुष नसबंदी : पुरुष नसबंदी ही सर्वोत्तम पद्धत आहे. यामध्ये शल्यचिकित्सक, शुक्राणू ज्या ट्यूबमधून जातात ती कापतात आणि बांधतात. ज्या पुरुषांना मूल नको आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे खूप स्वस्त आहे आणि महिला नसबंदीपेक्षा चांगले कार्य करते. नसबंदीनंतर तीन महिन्यांनी वीर्य शुक्राणूमुक्त होते.
advertisement
5. मेल बर्थ कंट्रोल पिल : पुरुष गर्भनिरोधक गोळी ही हार्मोनल गोळी आहे, जी पुरुष स्त्रियांप्रमाणेच घेऊ शकतात. यामध्ये पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती थांबते. मात्र या गोळीला औषध नियामक संस्थांकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही.
6. टेस्टोस्टेरॉन इंजेक्शन : हे एक इंजेक्शन आहे, जे पिट्यूटरी हार्मोन्स सोडण्यास प्रतिबंध करते. पिट्यूटरी हार्मोन शुक्राणूंच्या निर्मितीसाठी जबाबदार आहे. यामध्ये साप्ताहिक किंवा मासिक इंजेक्शन्स घ्यावी लागतात. त्याचे काही दुष्परिणामही होतात. यामुळे इंजेक्शन साइटवर वेदना, मुरुम, वजन वाढणे, असामान्य लिपिड्स आणि काही मानसिक परिणाम होतात. मात्र शास्त्रज्ञ या सगळ्याचा परिणाम दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
7. हार्मोनल कंट्रासेप्टिव जेल : या जेलचे नाव NES/T आहे. हे जेल त्वचेवर दररोज लावावे लागते, ज्यामुळे शुक्राणूंची निर्मिती थांबते. त्यात नायट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन मिसळले जातात. हे प्रोजेस्टेरॉन हार्मोनसारखे कार्य करते, जे शुक्राणूंचे उत्पादन थांबवते. या जेलचे एक इंजेक्शन देखील आहे, ज्यामध्ये एक समान कंपाऊंड असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 27, 2023 12:17 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Male Contraceptive Methods : फक्त कंडोमच नाही, पुरुषांसाठी हे आहेत गर्भनिरोधकाचे 7 सुरक्षित पर्याय!









