advertisement

दररोजच्या जेवणाची फोडणी महागणार, मोहरीच्या दरात मोठी वाढ, कारण काय?

Last Updated:

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोहरीला 8500 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला आहे. पाहुयात काय आहेत मोहरीच्या दरवाढी मागील कारणे.

+
मोहरी

मोहरी

जालना : सर्वसामान्य गृहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे, कारण दररोजच्या फोडणीत वापरली जाणारी मोहरी महागली आहे. जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोहरीला 8500 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला आहे. पाहुयात काय आहेत मोहरीच्या दरवाढी मागील कारणे.
मोहरी हे राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये घेतले जाणारे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रातही अल्प प्रमाणात मोहरीचे उत्पादन घेतलं जातं. सध्या बाजारपेठेत मोहरीची आवक नगण्य आहे. त्यामुळे मोहरीचे दर कडाडले आहेत.
दुसरीकडे आधुनिक पद्धतीने शेती करत असताना शेतकरी तणनाशकांचा अतिरेकी वापर करत आहेत. यामुळे प्रामुख्याने गहू पिकामध्ये आपोआप उगवणारी मोहरी कमी झाली आहे. परिणामी बाजारपेठेमध्ये मोहरीची आवक अत्यंत कमी आहे. मोहरीचे तेल हे हृदयरोगासाठी गुणकारी समजलं जातं. त्याचबरोबर दररोजच्या वापरातही मोहरीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. वाढलेली मागणी आणि घटलेली आवक यामुळे मोहरीच्या दरात वाढ झाल्याचं जालन्यातील व्यापाऱ्यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मोहरी पिकाकडे वळावं, जेणेकरून त्यांना चांगला आर्थिक फायदा होईल. आगामी काळामध्ये मोहरीचे दर हे चढेच राहण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दररोजच्या जेवणाची फोडणी महागणार, मोहरीच्या दरात मोठी वाढ, कारण काय?
Next Article
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
  • नव्या आर्थिक वर्षाचे रेडी रेकनर दर फायनल

  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

  • महसूल विभागाचे नवे नोटिफिकेशन

View All
advertisement