advertisement

पुणेरी डॉक्टरसाहेब, 2 दिवसांत नऊ किल्ले केले सर, अशी केली मोहीम यशस्वी, Video

Last Updated:

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. राजेश कणसे यांनी फक्त दोन दिवसांत नऊ किल्ले सर करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

+
News18

News18

पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. राजेश कणसे यांनी फक्त दोन दिवसांत नऊ किल्ले सर करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लहानपणापासून इतिहास आणि वाचनाची त्यांना आवड असल्याने गड-किल्ल्यांवरील अनेक पुस्तके त्यांनी अभ्यासली आहेत. या वाचनातूनच त्यांच्या मनात दुर्गभ्रमंतीची ओढ निर्माण झाली. त्यांनी आतापर्यंत अनेक गड किल्ले सर केले आहेत. अवघ्या दोन दिवसांत नऊ किल्ले सर केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सगळ्या विषयी त्यांनी लोकल 18 माहिती दिली आहे.
डॉ. राजेश कणसे यांनी सांगितले की, 15 नोव्हेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास स्कूटीने प्रवासाला सुरुवात केली. सर्वप्रथम सिंहगडाची चढाई करून ते सकाळी आठच्या आधी खाली आले. त्यानंतर पाबेघाट मार्गे तोरणा किल्ल्यावर पोहोचून दुपारी अडीचपर्यंत किल्ल्याची पाहणी केली. पुढे पालीमार्गे राजगड गाठून किल्ल्यावरील महत्त्वाच्या ठिकाणांचे दर्शन घेऊन ते संध्याकाळी सहाच्या सुमारास खाली उतरले.
advertisement
पहिल्या दिवशी त्यांनी 220 किमी बाईक रायडिंग आणि 26 किमीचा ट्रेक केला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी कोरीगडचा ट्रेक केला. त्यानंतर घनगड, तुंग, तिकोणा, लोहगड आणि विसापूर हे किल्ले पूर्ण केले. या दिवशी त्यांनी 176 किमी बाईक रायडिंग आणि 22 किमी ट्रेक करत दोन दिवसांत नऊ किल्ल्यांची मोहीम यशस्वी केली.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भक्ती, गडकिल्ल्यांबद्दलची ओढ आणि त्यांची प्रेरणा यामुळे त्यांनी आतापर्यंत राज्यातील तब्बल 80 किल्ले सर केले आहेत. त्यांची ही मोहीम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेरी डॉक्टरसाहेब, 2 दिवसांत नऊ किल्ले केले सर, अशी केली मोहीम यशस्वी, Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement