Lockdown : लॉकडाऊनमध्ये जन्मलेली बाळं इतरांपेक्षा वेगळी, हा अहवाल तुम्हालाही चकीत करेल!

Last Updated:

कोविड-19च्या संसर्गानंतर अनेकांनी आपल्या आरोग्याबद्दल वेगवेगळी निरीक्षणं नेहमी नोंदवली आहेत. एका नव्या अभ्यासात लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या बाळांबाबत नवा दावा करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये जन्मलेली बाळं इतरांपेक्षा वेगळी, हा अहवाल तुम्हालाही चकीत करेल!
लॉकडाऊनमध्ये जन्मलेली बाळं इतरांपेक्षा वेगळी, हा अहवाल तुम्हालाही चकीत करेल!
मुंबई : कोविड-19च्या संसर्गानंतर अनेकांनी आपल्या आरोग्याबद्दल वेगवेगळी निरीक्षणं नेहमी नोंदवली आहेत. अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, तर काही ठिकाणी असं लक्षात आलं, की या काळात जन्म झालेल्या मुलांमध्ये आजाराशी लढण्याची शक्ती वाढली आहे. एका संशोधन अहवालात असं नोंदवण्यात आलं आहे की, लॉकडाउनमध्ये जन्म झालेली मुलं खूप कमी प्रमाणात आजारी पडत आहेत. त्यांची रोगप्रतिकारशक्ती अन्य मुलांच्या तुलनेत अधिक आहे.
लॉकडाउन हा काळ जगभरात सगळ्यांना वेगवेगळ्या अर्थानं धडे देणारा ठरला. व्यावसायिक, शैक्षणिक पातळ्यांवर लोक स्वावलंबी झाले. आरोग्याविषयी थोडे अधिक जागरूक झाले. आहार, व्यायाम, औषधोपचार, वैद्यकीय सल्ला याबाबत जनजागृती झाली. या काळात जन्म झालेल्या बालकांच्या आरोग्यावरही वेगळा परिणाम झाल्याचं काही संशोधकांनी म्हटलं आहे. आयर्लंड युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्कमधल्या संशोधकांनी असं नमूद केलं आहे, की लॉकडाउनच्या काळात जन्म झालेली बालकं अन्य काळात जन्म झालेल्या बालकांपेक्षा वेगळी आहेत. यांच्या पोटातले मायक्रोबायोम हे अन्य मुलांपेक्षा वेगळे असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे या मुलांमधलं ॲलर्जीचं प्रमाण तुलनेने खूप कमी आहे.
advertisement
मायक्रोबायोम म्हणजे काय?
एनआयएचच्या माहितीनुसार, एका निरोगी व्यक्तीच्या आतड्यात मायक्रोबायोटामध्ये असंख्य चांगली कामं होत असतात. अन्नातल्या पचनयोग्य घटकांच्या चयापचय क्रियेतून ऊर्जा मिळवणं, संसर्गापासून बचाव आणि रोगप्रतिकारप्रणालीचं कार्य त्यात समाविष्ट आहे.
अभ्यासातून काय निष्पन्न झालं?
संशोधनात्मक अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की एका वर्षात कोविड काळात जन्म झालेल्या बालकांमध्ये ॲलर्जीची प्रकरणं केवळ 5 टक्के आढळली आहेत. पूर्वी हा आकडा 22.8 टक्के इतका असायचा. इतकंच नव्हे तर या बालकांपैकी केवळ 17 टक्के मुलांनाच वर्षभरात अँटीबायोटिक्स औषधं घ्यावी लागली आहेत. पूर्वी हे प्रमाण 80 टक्के इतकं होतं.
advertisement
मुलांना मिळालं नैसर्गिक अँटीबायोटिक
लॉकडाउनमध्ये जन्म झालेल्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असल्याचं एक मोठं कारण म्हणजे, या काळात प्रदूषण कमी होतं. कारण लॉकडाऊनमध्ये सगळेच व्यवहार बंद होते. त्यामुळे हवेचं प्रदूषण जवळपास झालंच नाही, असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे मुलांच्या फुफ्फुसांमध्ये अशुद्ध हवा किंवा प्रदूषण जाऊ शकलेलं नाही. अर्थातच ही मुलं खूप सुरक्षित वातावरणात वाढली आहेत. स्वच्छ आणि शुद्ध हवा त्यांना या काळात मिळाली आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या मुलांची वाढ उत्तम रीतीनं झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lockdown : लॉकडाऊनमध्ये जन्मलेली बाळं इतरांपेक्षा वेगळी, हा अहवाल तुम्हालाही चकीत करेल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement