Oil Free Papad : ना तेल, ना एअर फ्रायर, किचनमधला 'हा' पदार्थ वापरून तळा पापड
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
तेलाचा वापर न करता देखील तुम्ही पापड तळू शकता. सध्या ऑईल फ्री पापड बनवण्याची भन्नाट ट्रिक समोर आली आहे.
अनेक भारतीय लोकांच्या जेवणात पापड हा पदार्थ असतोच. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी अनेकजण पापड खातात. परंतु हे पापड तेलात तळले जात असल्याने ते फार ऑयली होतात. त्यामुळे हेल्द कॉन्शियस लोकांना पापड आवडत असले तरी अनेकजण पापड खाणे टाळतात. परंतु आता असं करण्याची गरज नाही. तेलाचा वापर न करता देखील तुम्ही पापड तळू शकता. सध्या ऑईल फ्री पापड बनवण्याची भन्नाट ट्रिक समोर आली आहे.
ऑईल फ्री पापड करण्याची भन्नाट ट्रिक शेफ पंकज भदौरिया यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी सांगितलेल्या टिप्सनुसार तुम्ही मिठाचा वापर करून पापड तळू शकता. यासाठी तुम्ही गॅसवर कढई गरम करून त्यात तेलाऐवजी मीठ टाका. मीठ साधारण मध्यम गरम झाल्यावर त्यात पापड टाका. गरम मिठावर तुम्ही पापड फ्राय करू शकता. केवळ पापडचं नाही तर फेण्या देखील मिठात फ्राय करू शकता. या टिप्स वापरून तुम्ही हेल्दी ऑईल फ्री पापड खाऊ शकता.
advertisement
ऑईल फ्री पापड करण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या एअर फ्रायरचा देखील वापर करू शकता. परंतु एअर फ्रायर खरेदी करणे खर्चीक असते. तेव्हा तुम्ही मिठाचा वापर करून सोप्या ट्रिकने ऑईल फ्री पापड बनवू शकता.
advertisement
ऑईल फ्री पापड खाण्याचे फायदे :
विविध प्रकारचे पापड हे सोडियम आणि पोटॅशियमने युक्त असतात. पापडांमध्ये मॅग्नेशियम, लोह आणि कार्बोहायड्रेट्सची निरोगी मात्रा असते. घरी तयार केलेले पापड खाणे उत्तम ठरते. हेल्दी स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही पापड खाऊ शकता. पापडमध्ये फायबरचे चांगले प्रमाण असल्याने पचनक्रिया देखील चांगली राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 07, 2024 4:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Oil Free Papad : ना तेल, ना एअर फ्रायर, किचनमधला 'हा' पदार्थ वापरून तळा पापड