Strep Throat Medicine : टॉन्सिलचा त्रास आणि घसा चोक होतोय? डॉक्टरांकडून जाणून कोणतं औषध घ्यावं..

Last Updated:

हवामानातील बदलामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाची प्रकरणे वाढतात. मोठ्या प्रमाणात लोकांना सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे आणि नाक वाहणे याचा त्रास होत आहे. अनेकांचा घसा चोक होण्याचा त्रासही होतोय, त्यांना अन्नपदार्थ गिळण्यास त्रास होत आहे.

News18
News18
मुंबई : सध्या हवामान सामान्य नाही, ते सारखे बदलते आहे. त्यामुळे यासंबंधित त्रासही वाढले आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेले लोक या त्रासांना सहज बळी पडतायत. हवामानातील बदलामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाची प्रकरणे वाढतात. मोठ्या प्रमाणात लोकांना सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे आणि नाक वाहणे याचा त्रास होत आहे. अनेकांचा घसा चोक होण्याचा त्रासही होतोय, त्यांना अन्नपदार्थ गिळण्यास त्रास होत आहे.
घसा चोक होतो तेव्हा अन्न आणि पेय गिळण्यास खूप त्रास होतो आणि वेदना जाणवते. यामुळे घशाच्या आत सूज येते आणि अनेकांना टॉन्सिलचा त्रास होऊ लागतो. बदलत्या ऋतूमध्ये ही समस्या सामान्य आहे. परंतु, त्यावर योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे. पण अखेर, घसा चोक का होतो आणि या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते औषध घ्यावे? चला हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
advertisement
सर गंगा राम हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचा घसा खवखवत असेल तर ते व्हायरल इन्फेक्शन असू शकते आणि पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतल्याने आराम मिळू शकतो. जर एखाद्याचा घसा गुदमरत असेल आणि त्याला अन्न गिळण्यास त्रास होत असेल तर तो बॅक्टेरियाचा संसर्ग असू शकतो. घशात बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे घसा चोक किंवा वेदना होतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
डॉ. सोनिया रावत सांगतात की, घसा चोक झाला असेल तर डॉक्टर त्यापासून सुटका करण्यासाठी अँटीबायोटिक्स देतात. ही औषधे हळूहळू बॅक्टेरियाचा संसर्ग दूर करतात आणि लोकांचा घसा 4-5 दिवसांत पूर्णपणे सामान्य होतो. घशामध्ये काहीतरी गुंतल्यासारखे किंवा अडकल्यासारखे वाटल्यास स्वतःहून औषध घेऊ नये, अन्यथा समस्या वाढू शकते. अशावेळी गरम पदार्थ खावेत, त्यामुळे घशाला आराम मिळतो आणि घशातील सूज कमी होण्यास मदत होते. ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
तज्ञांच्या मते, जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होत असेल तर तुम्ही पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेऊ शकता. हे मेडिसिन घेतल्याने तुम्हाला दोन-तीन दिवसांत आराम मिळत नसेल आणि तुमचा त्रास वाढत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. तपासणी करून घ्या. बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि खाण्यापिण्याच्या सवयींचीही विशेष काळजी घ्यायला हवी. योग्य उबदार कपडे घालावे आणि सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळावे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Strep Throat Medicine : टॉन्सिलचा त्रास आणि घसा चोक होतोय? डॉक्टरांकडून जाणून कोणतं औषध घ्यावं..
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement