Okra water benefits: आरोग्याच्या फायद्याचं आहे ‘या’ भाजीचं पाणी, ॲसिडिटीसह अनेक गंभीर आजार पळतील दूर

Last Updated:

Health benefits of Okra Water in Marathi: भेंडी ही पोषणमूल्यांनी समृद्ध असून त्यात कमी कॅलरीज, प्रोटीन्स, फायबर्स, कार्बोहार्डेट्स, व्हिटॅमिन C, A, K आणि फोलेट याशिवाय मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यासारखी खनिजे असतात. याच सगळ्या पोषकतत्त्वांमुळे आयुर्वेदातही भेंडीला विशेष महत्त्व आहे. मात्र फक्त भेंडीच नाही तर भेंडीचं पाणी देखील आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं.

News18
News18
मुंबई : भेंडी... आपल्या अनेकांच्या स्वयंपाक घरातला एक पदार्थ. अनेकांसाठी भेंडी म्हणजे जीव की प्राण, मात्र काही जण भेंडीला पाहून नाकं मुरगडात. मात्र भेंडी ही फक्त चवीपुरता मर्यादित नाहीये. भेंडीत असलेल्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे भेंड्याची भाजी खाणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरत. भेंडी ही पोषणमूल्यांनी समृद्ध असून त्यात कॅलरीज, प्रोटीन्स, फायबर्स, कार्बोहार्डेट्स, व्हिटॅमिन C, A, K आणि फोलेट याशिवाय मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यासारखी खनिजे असतात.
याशिवाय भेंडीला आयुर्वेदातही विशेष महत्त्व आहे. मात्र फक्त भेंडीच नाही तर भेंडीचं पाणी देखील आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं.
जाणून घेऊयात भेंडीचं पाणी पिण्याचे फायदे
सर्वसामान्यपणे भेंडीला इंग्रजीमध्ये लेडी फिंगर जरी म्हणत असले तरीही भेंडीचं पाणी हे ओक्रा वॉटर नावाने जास्त प्रसिद्ध आहे. भेंडीमध्ये विरघळणारं फायबर असतं, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. भेंडी पाण्यात उकळून ते पाणी नियमितपणे प्यायलं तर ते आपल्या शरीरातील अशुद्ध पदार्थ सहज शरीराबाहेर  काढून टाकायला मदत होते. भेंडीचं पाणी प्याल्याने पोट आतून स्वच्छ व्हायला मदत होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारून अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस आणि ॲसिडिटीचा त्रास कमी व्हायला मदत होते. भेंडीच्या पाण्यामुळे शरीरातली अतिरिक्त चरबीही जळायला मदत होते. यकृतापासून मूत्रपिंडापर्यंतच्या अनेक आजारांवर भेंडीचं पाणी खूप फायदेशीर ठरू शकतं. नियमितपणे भेंडीचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांना दूर ठेवता येतं.
advertisement
Health benefits of Okra Water in Marathi: आरोग्याच्या फायद्याचं आहे ‘या’ भाजीचं पाणी, ॲसिडिटीसह अनेक गंभीर आजार जातील पळून

डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायद्याचं :

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही भेंडीचं पाणी फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे नियमितपणे भेंडीचं पाणी प्यायल्यामुळे रक्तातील डायबिटीस नियंत्रणात ठेवता येतो.
advertisement

हृदयरोगांवर वरदान भेंडी :

भेंडीमध्ये पोटॅशियम आणि फोलेटसारखे घटक आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास भेंडीचं पाणी फायद्याचं ठरू शकतं. भेंडीच्या पाण्याचं सेवन केल्याने रक्तातलं कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहायला मदत होते. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.

त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याची भेंडी :

भेंडीत असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचं आरोग्य सुधारायलाही मदत होते. यामुळे त्वचा हायड्रेट राहून सुरकुत्या आणि मुरुमांचा त्रास कमी होतो.
advertisement

डोळ्यांचं आरोग्य सुधारतं :

गाजर आणि बीट खाल्ल्याने दृष्टीदोष कमी होतात हे आपल्याला माहिती आहेच. मात्र भेंडी ही सुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याची आहे.भेंडीमध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन असतात, नियमितपणे भेंडी खाल्ल्यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते.
advertisement

वजन कमी होतं :

भेंडीमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे भेंडी खाल्ल्यामुळे पोट भरलेलं राहून भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते.

गर्भवती महिलांसाठी फायद्याची :

भेंडीमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय भेंडी खाणं हे गर्भाच्या वाढीसाठीही फायद्याचं आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Okra water benefits: आरोग्याच्या फायद्याचं आहे ‘या’ भाजीचं पाणी, ॲसिडिटीसह अनेक गंभीर आजार पळतील दूर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement