पनीर की टोफू कशामध्ये असतं सर्वात जास्त प्रोटीन, शरीरासाठी काय चांगलं?
- Published by:Kranti Kanetkar
- local18
Last Updated:
पनीर आणि टोफू हे प्रोटीन आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. मंजू मठाळकर यांच्या मते, दोन्हीचे फायदे आहेत, पण गुणवत्ता आणि शरीराची गरज लक्षात घेऊन योग्य निवड करावी.
चवीन पनीर खात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पनीरमध्ये प्रोटीन तर असतंच पण त्याही पेक्षा जास्त टोफूमध्ये असतं असं म्हटलं जातं. या दोन्हीपैकी शरीरासाठी काय चांगलं आणि नक्की प्रोटीन सर्वात जास्त कशात असतं ते जाणून घेऊया.
पनीर आणि टोफू हे दोन्ही प्रोटीन आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. पनीर दुधापासून तयार होते, तर टोफू सोयाबीनच्या दुधापासून बनवले जाते. पण या दोघांपैकी काय खावे, कशातून अधिक पोषण मिळते आणि शरीरासाठी काय चांगले आहे, याबाबत आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पनीर आणि टोफूमधील मुख्य फरक
पनीर आणि टोफू या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि प्रथिने (प्रोटीन) असतात, परंतु त्यांचे स्रोत भिन्न आहेत. पनीर हे गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासून तयार होते. टोफू हा सोयाबीनच्या दुधावर प्रक्रिया करून तयार केला जातो. या दोन्हीमध्ये काही विशिष्ट घटक वेगळे आहेत. टोफूमधून शरीराला प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळतात.
advertisement
शरीरासाठी काय चांगले?
आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांच्या मते, दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत, पण काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बाजारात सध्या भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रतीचे पनीर खाणे आवश्यक आहे. शक्य असल्यास, घरीच पनीर तयार करणे हा एक चांगला पर्याय आहे.
advertisement
टोफूचे फायदे
टोफू देखील चांगल्या प्रतीचा असणे गरजेचे आहे. टोफूमध्ये चरबीचे (फॅट) प्रमाण पनीरपेक्षा कमी असते. तसेच, फायबरचे प्रमाण पनीरपेक्षा टोफूमध्ये जास्त असते. ज्यांना प्रथिनांची कमतरता आहे, ते आपल्या आहारात टोफूचा समावेश करू शकतात, कारण टोफू सोयाबीनपासून बनवला जातो. ज्या लोकांना दुधाची ॲलर्जी आहे, अशी लोक पनीरऐवजी टोफूचा समावेश आपल्या आहारात करू शकतात.
advertisement
Amarkand Benefits : तुम्ही अमरकंद जडीबुटीबद्दल ऐकलं आहे? सांधेदुखी-अपचन यांसह अनेक समस्यांवर रामबाण!
मंजू मठाळकर यांनी असा सल्ला दिला आहे की, तुम्ही टोफू आणि पनीर दोन्हीही प्रमाणातच खावे. त्याचा अतिरेक करू नये. कारण, जर तुम्ही या दोन्हीचे जास्त सेवन केले, तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात. दोन्ही पर्याय आरोग्यदायी असले तरी, त्यांची गुणवत्ता आणि तुमच्या शरीराची गरज लक्षात घेऊन योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 4:15 PM IST

