Organizing kitchen : असे करा स्वयंपाकघरातील नियोजन; कामं होतील पटापट, किचनही राहील स्वच्छ..

Last Updated:

Organizing Your Kitchen For Efficiency : तुमच्याकडे असे काही हॅक्स असतील, जे चुटकीसरशी काम संपवतील आणि तुम्ही लवकर तुमच्या कुटुंबासोबत गप्पा मारू शकाल, तर किती छान होईल. या 5 सोप्या ट्रिक्स तुमचा वेळ वाचवतील.

किचन ऑर्गनायझेशन टिप्स
किचन ऑर्गनायझेशन टिप्स
मुंबई : सकाळी ऑफिसची घाई असो किंवा रात्रीच्या थकव्यानंतर स्वयंपाक करायचा असो, किचनमधील कामं लवकर संपवण्याची इच्छा प्रत्येकाची असते. अशावेळी तुमच्याकडे असे काही हॅक्स असतील, जे चुटकीसरशी काम संपवतील आणि तुम्ही लवकर तुमच्या कुटुंबासोबत गप्पा मारू शकाल, तर किती छान होईल. या 5 सोप्या आणि मजेदार किचन ट्रिक्स केवळ तुमचा वेळच वाचवणार नाहीत, तर तुमचा स्वयंपाक सुपरफास्ट आणि मनोरंजक बनवतील.
लक्षात ठेवा की, योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही किचनमधील कामं फटाफट संपवू शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी 5 शानदार किचन हॅक्स घेऊन आलो आहोत, जे केवळ तुमचा वेळच वाचवणार नाहीत तर तुमचे काम अधिक मजेदार बनवतील.
आधीच तयारी करून ठेवा : काम लवकर संपवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की, तुम्ही किचनमधील तयारी आधीच करून ठेवा. उदाहरणार्थ, भाज्या आधीच धुऊन आणि कापून स्टोअर करा. आलं-लसूण पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे स्वयंपाक करताना अर्धा वेळ वाचतो. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व मसाले, तेल आणि भांडी जवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला वारंवार उठावे लागणार नाही.
advertisement
एकाच वेळी अनेक कामे करा : एकाच वेळी अनेक कामे केल्याने वेळ वाचतो. उदाहरणार्थ, जेव्हा भाजी शिजत असेल, तेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ मळू शकता. त्याचप्रमाणे जेव्हा पाणी उकळत असेल, तेव्हा तुम्ही इतर कामे जसे की भाज्या कापणे किंवा मसाले तयार करणे करू शकता. या पद्धतीने तुम्ही एकाच वेळी दोन ते तीन कामे पूर्ण करू शकता.
advertisement
स्मार्ट गॅजेट्सचा वापर करा : आजच्या काळात किचनसाठी अनेक स्मार्ट गॅजेट्स उपलब्ध आहेत, जे तुमचे काम सोपे बनवू शकतात. जसे की, भाज्या कापण्यासाठी फूड प्रोसेसर, पेस्ट बनवण्यासाठी ग्राइंडर किंवा भाजी सोलण्यासाठी इलेक्ट्रिक पीलर. यांच्या मदतीने तुमचा वेळही वाचेल आणि कामही लवकर होईल.
सोबतच भांडी धुण्याची सवय लावा : किचनमधील साफसफाई एक मोठे डोकेदुखीचे काम असू शकते. हे काम सोपे करण्यासाठी स्वयंपाक करताना भांडी लगेच धुण्याची सवय लावा. जसे तुम्ही एखाद्या भांड्याचा वापर कराल, लगेच ते धुऊन घ्या. यामुळे काम संपल्यानंतर भांड्यांचा ढीग होणार नाही आणि तुमचे किचन स्वच्छ राहील.
advertisement
उरलेल्या अन्नाचे नियोजन करा : अनेकदा असे होते की, रात्रीच्या जेवणानंतर उरलेले अन्न दुसऱ्या दिवशी उपयोगी येऊ शकते. जर तुम्ही आधीच विचार करून थोडे जास्त अन्न बनवले, तर दुसऱ्या दिवसाचे अर्धे काम कमी होते. उरलेली डाळ, भात किंवा भाजीचा वापर एक नवीन रेसिपी बनवण्यासाठी करा, जसे की भातापासून फ्राइड राइस किंवा डाळीपासून पराठा.
advertisement
या टिप्सचा अवलंब करून, तुम्ही केवळ वेळेची बचत करणार नाहीत, तर किचनमधील कामही सोपे आणि मजेदार बनवू शकाल. एक व्यवस्थित किचन आणि योग्य नियोजनामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही किचनमध्ये जाल, तेव्हा या सोप्या ट्रिक्स नक्की वापरून पाहा.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Organizing kitchen : असे करा स्वयंपाकघरातील नियोजन; कामं होतील पटापट, किचनही राहील स्वच्छ..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement