Poha Uttapam Recipe : कांदेपोहे नाही आता पोह्यापासून बनवा उत्तपा, 10 मिनिटात बनेल हेल्दी आणि चविष्ट अशी नवीन रेसीपी

Last Updated:

Morning Breakfast Idea : रोजरोज कांदे पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी पोह्यांपासून झटपट तयार होणारी आणखी एक रेसिपी आणली आहे. जी चविष्ट तर आहेच, शिवाय झटपट तयार होते.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : पोहे म्हटलं की सर्वात आधी लोकांना आठवतं, ते कांदे पोहो. सर्वांच्या घरात बनणारी ही अगदी सामान्य रेसिपी आहे. सकाळी घाईच्या वेळी अगदी काही मिनिटात तयारे होणारे पोहो हे खूपच हेल्दी आणि पोटभरणारी रेसीपी आहे. पण रोजरोज कांदे पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी पोह्यांपासून झटपट तयार होणारी आणखी एक रेसिपी आणली आहे. जी चविष्ट तर आहेच, शिवाय झटपट तयार होते.
चला ती कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय सामग्री लागणार आहे हे जाणून घेऊ.
सामग्री: अर्धा कप पोहा आणि रवा, आर्धा कप दही, अर्धा कप पानी, अर्धा टीस्पून मीठ, तेल आवश्यकतेनुसार
टॉपिंगसाठी : अर्धा कांदा, शिमला मिर्ची आणि गाजर, 5 फरसबी, 2 टेबलस्पून कोथिंबीर, चिली फ्लेक्स इत्यादी
कृती:
5 मिनिटांसाठी पोहे पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून पोहे मिक्सरला वाटून पेस्ट तयार करा. त्यात रवा, दही, पाणी आणि मीठ टाका आणि थोडा वेळ रेस्टसाठी ते बॅटर बाजूला ठेवा. तोपर्यंत टॉपिंगसाठीचे सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा आणि ते बाजूला ठेवा.
advertisement
पोह्याच्या बॅटरपासून छोटे उत्तपम तव्यावर घालून त्यावर टॉपिंग पसरा. थोडं तेल सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा.
नाश्त्यासाठी दररोज काहीतरी वेगळं आणि झटपट तयार होणारं हवं असेल, तर ‘पोहा उत्तपम’ ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. अगदी थोडक्यात साहित्य आणि कमी वेळात तयार होणारा हा पोहा उत्तपम हलकासा असूनही भरपूर पोषणमूल्य देणारा आहे. चवीनं आणि पोषणमूल्यांनी भरलेला हा पोहा उत्तपम नाश्त्यासाठी एक भन्नाट पर्याय ठरू शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Poha Uttapam Recipe : कांदेपोहे नाही आता पोह्यापासून बनवा उत्तपा, 10 मिनिटात बनेल हेल्दी आणि चविष्ट अशी नवीन रेसीपी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement