Chid Health Care : बाजारातील केमिकलयुक्त मलम विसरा, पावसाळ्यात मुलांच्या सर्दीसाठी बनवा घरगुती Baby Vicks

Last Updated:

Homemade Baby Vicks : पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी घरगुती विक्स हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे.तूप आणि कापूर वापरून तयार केलेले हे मलम मुलांसाठी सुरक्षित असून औषधांशिवाय दिलासा देणारे आहे.

News18
News18
Child Health : पावसाळा आला की हवेत गारवा वाढतो, वारंवार पाऊस पडतो आणि त्यामुळेच मुलांना सर्दी, खोकला आणि अंगदुखी किंवा कफ होण्याचा त्रास होतो. बाजारात मिळणाऱ्या विक्स, बाम किंवा मलमाचा वापर आपण करतोच; पण लहान मुलांची त्वचा नाजूक असल्याने केमिकलयुक्त मलम कधी कधी त्यांना त्रासदायक ठरतो. अशा वेळी घरीच बनवलेली घरगुती बेबी विक्स हा उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो.
ही बेबी विक्स पूर्णपणे नैसर्गिक आहे कारण यात तूप, कापूर आणि ओवा वापरले जातात. हे तिन्ही पदार्थ आपल्या घरात सहज मिळतात आणि आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत.
बेबी विक्स बनवण्याची कृती
1) एका कढईत 3 ते 4 चमचे तूप टाकून ते छान गरम करून घ्या.
2) तूप गरम झाल्यावर त्यात 8 ते 10 कापूर टाका.
advertisement
3) कापूर पूर्णपणे तुपात मिसळेपर्यंत ढवळत रहा.
4) तुपातून धूर निघू लागला की गॅस बंद करून द्या.
5) तूप अजून गरम असतानाच त्यात 1 चमचा ओवा टाका.
6) नीट ढवळून झाल्यावर गाळणीच्या सहाय्याने तूप गाळून घ्या.
7) हे तूप थंड झाल्यावर ते एका छोट्या डबीत घाला आणि अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवून द्या.
advertisement
8) फ्रिजमध्ये सेट झाल्यानंतर तुमची घरगुती बेबी विक्स तयार होईल.
बेबी विक्सचे फायदे
1) सर्दी-खोकला कमी होतो – कापूर आणि ओवा दोन्हीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक आणि कफ कमी करणारे गुण असतात. छातीवर किंवा पाठीवर लावल्यास श्वसनमार्ग मोकळे होतात.
2) नाक बंद होण्याचा त्रास कमी होतो – पावसाळ्यात मुलांचे नाक सतत गळते किंवा बंद होते. झोपताना छातीवर आणि नाकाजवळ हलक्या हाताने लावल्यास श्वास घेणे सोपे होते.
advertisement
3) शरीराला उब मिळते – तूप आणि ओवा शरीराला आतून उष्णता देतात, त्यामुळे गारव्यामुळे होणारी अंगदुखी किंवा शिरशिरी कमी होते.
4) त्वचेवर सुरक्षित – घरगुती असल्यामुळे यात रसायने नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या कोवळ्या त्वचेवरही ते सहज वापरता येते.
5) प्रौढांनाही उपयुक्त – फक्त मुलांसाठीच नाही तर मोठ्यांनीही सर्दी-खोकल्याच्या त्रासात ही विक्स वापरू शकतात.
advertisement
वापरण्याची पद्धत
1)झोपण्यापूर्वी मुलांच्या छातीवर, पाठीवर आणि पायांच्या तळव्यांवर हलक्या हाताने ही विक्स लावावी.
2)खूप थंड झालेल्या हवामानात पायांना मोजे घालावेत, ज्यामुळे उब टिकून राहते.
3)लहान बाळांसाठी अगदी थोड्या प्रमाणातच वापरावा.
कोणती खबरदारी घ्यावी
ही विक्स ७-८ दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यास टिकते. नंतर पुन्हा नवी करून घ्यावी आणि महत्त्वाचे म्हणजे जर लहान मुलांच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी दिसली तर लगेच याचा वापर थांबवावा तसचे विक्स डोळ्याजवळ किंवा तोंडाजवळ लावू नये.(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Chid Health Care : बाजारातील केमिकलयुक्त मलम विसरा, पावसाळ्यात मुलांच्या सर्दीसाठी बनवा घरगुती Baby Vicks
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement