Shoulder Pain : खांद्यामध्ये होतायत तीव्र वेदना? 'ही' असू शकतात कारणं, इंस्टंट रिलीफसाठी वापरा 'हे' उपाय

Last Updated:

आजकाल खांदेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीची बसण्याची पद्धत, जास्त वेळ एकाच स्थितीत बसून काम करणे किंवा अचानक जास्त वजन उचलणे ही यामागची प्रमुख कारणे आहेत.

News18
News18
Reasons Of Shoulder Pain : आजकाल खांदेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीची बसण्याची पद्धत, जास्त वेळ एकाच स्थितीत बसून काम करणे किंवा अचानक जास्त वजन उचलणे ही यामागची प्रमुख कारणे आहेत. बऱ्याचदा ही वेदना सामान्य वाटली तरी ती तुमच्या रोजच्या कामात अडथळा आणू शकते. काही घरगुती उपायांनी यापासून त्वरित आराम मिळू शकतो, पण कधीकधी यामागे गंभीर कारणेही असू शकतात.
चुकीची मुद्रा आणि स्नायूंचा ताण
तुमची बसण्याची किंवा झोपण्याची पद्धत चुकीची असल्यास, खांद्यांच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे वेदना होतात. तसेच, जास्त व्यायाम किंवा वजन उचलल्याने स्नायू दुखू शकतात.
फ्रोजन शोल्डर
या स्थितीमध्ये खांद्याचे सांधे खूप घट्ट होतात, ज्यामुळे खांद्याची हालचाल करणे कठीण होते. यामध्ये तीव्र वेदना आणि हालचाल कमी होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
advertisement
त्वरित आराम मिळवण्यासाठी बर्फाचा शेक
जर तुम्हाला अचानक खांद्यात वेदना सुरू झाली असेल, तर त्वरित बर्फाचा शेक घ्या. एका टॉवेलमध्ये बर्फ घेऊन वेदना होत असलेल्या जागेवर 15 ते 20 मिनिटे लावा. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
हलके ताणण्याचे व्यायाम
खांद्याच्या स्नायूंना आराम देण्यासाठी काही हलके व्यायाम करा. जसे की, खांदे हळू हळू गोलाकार फिरवणे किंवा हाताला विरुद्ध दिशेने ताणणे. हे व्यायाम वेदना कमी करण्यास मदत करतात.
advertisement
विश्रांती घ्या आणि मालिश करा
खांदेदुखी होत असताना जास्त काम किंवा हालचाल टाळा. खांद्यांना विश्रांती दिल्यास स्नायू लवकर बरे होतात. तुम्ही हलक्या हातांनी मालिश देखील करू शकता, पण जास्त दाब देऊ नका.
कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
जर घरगुती उपायांनंतरही वेदना कमी होत नसेल, ती खूप तीव्र असेल किंवा खांदा अजिबात हलवता येत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. खांदेदुखी टाळण्यासाठी योग्य मुद्रा आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. पण, जर वेदना गंभीर असेल, तर योग्य उपचारांसाठी डॉक्टरांना भेटणे सर्वात महत्त्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shoulder Pain : खांद्यामध्ये होतायत तीव्र वेदना? 'ही' असू शकतात कारणं, इंस्टंट रिलीफसाठी वापरा 'हे' उपाय
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement