Famous Food In Mumbai : कॉर्न मॅगी ते चीज कॉर्न पास्ता, घरगुती चवीच उत्तम मुंबईतील ठिकाण, फक्त 39 रुपयांपासून घ्या आस्वाद
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रणाली पाटील आणि तन्मय मोरे यांनी उभारलेला हा छोटेखानी पण अत्यंत खास फूड पॉइंट त्यांच्या मेहनतीचा आणि घरगुती चवीचा उत्तम ठिकाण आहे.
मुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. भांडुप पूर्व परिसरात नुकतंच सुरू झालेलं टीपी मॅगी पॉइंट हे ठिकाण सध्या तरुणाईचं नवं आकर्षण बनलं आहे. प्रणाली पाटील आणि तन्मय मोरे यांनी उभारलेला हा छोटेखानी पण अत्यंत खास फूड पॉइंट त्यांच्या मेहनतीचा आणि घरगुती चवीच उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी फक्त चविष्ट मॅगीच नाही तर कोल्ड कॉफी आणि पास्ताही अप्रतिम मिळतो, तेही अगदी परवडणाऱ्या किमतीत. या ठिकाणचा मेन्यू अगदी फक्त 39 पासून सुरू होतो आणि 100 च्या आत संपतो, त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमधील तरुणांपर्यंत सर्वांना हा पर्याय परवडतो.
टीपी मॅगी पॉइंटची सर्वात प्रसिद्ध डिश म्हणजे त्यांची टीपी स्पेशल मॅगी जी लोकांच्या खास आवडीची झाली आहे. यामागचं रहस्य म्हणजे त्यात वापरला जाणारा घरगुती मालवणी ठेचा जो त्यांनी स्वतः तयार केलेला आहे. त्याचं झणझणीत आणि मसालेदार फ्यूजन प्रत्येक घासात जाणवतं.
advertisement
मॅगीच्या विविध व्हरायटीजमध्ये प्लॅन मॅगी, डबल मसाला, कॉर्न मॅगी, चीज मॅगी, तंदूरी मॅगी, पेरी पेरी मॅगी आणि अर्थातच टीपी स्पेशल मॅगीचा समावेश आहे. प्रत्येक प्रकारची मॅगी वेगळ्या टचमध्ये सादर केली जाते आणि त्यामुळेच ग्राहक पुन्हा पुन्हा इथे येतात.
मॅगीसोबतच इथली कोल्ड कॉफीही तितकीच लोकप्रिय आहे. फक्त 40 पासून सुरू होणाऱ्या कॉफी मेनूमध्ये ओरिओ कोल्ड कॉफी, किटकॅट कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी विथ आइसक्रीम अशा आकर्षक व्हरायटीज उपलब्ध आहेत. थंडगार कॉफी आणि मसालेदार मॅगीचं हे कॉम्बिनेशन आजच्या तरुणाईच्या पसंतीचं ठरतं आहे.
advertisement
तसंच पास्ता प्रेमींसाठी इथे 69 पासून सुरू होणाऱ्या पेरी पेरी पास्ता, चीज कॉर्न पास्ता, रेड सॉस, पिंक सॉस आणि व्हाइट सॉस पास्तासारख्या डिशेसही उपलब्ध आहेत. सर्वच पदार्थ घरगुती पद्धतीने आणि स्वच्छतेचा पूर्ण विचार करून तयार केले जातात.
आज टीपी मॅगी पॉइंट हे केवळ फूड स्टॉल नसून भांडुप पूर्वेतील एक छोटं टेस्ट डेस्टिनेशन बनलं आहे. जिथे चव, परवडणारी किंमत आणि घरगुती आपलेपणा जाणवतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 11, 2025 4:42 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Famous Food In Mumbai : कॉर्न मॅगी ते चीज कॉर्न पास्ता, घरगुती चवीच उत्तम मुंबईतील ठिकाण, फक्त 39 रुपयांपासून घ्या आस्वाद







