Coriander Soup: किडनी आणि कॅल्शियमसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरच्या घरी झटपट कसं करायचं?

Last Updated:

Coriander Soup: हिवाळ्यात अनेकजण विविध प्रकारचे सूप आवर्जून घेत असतात. थंडीच्या दिवसांत कोथिंबीर सूप देखील अत्यंत लाभदायी मानलं जातं. पाहूया रेसिपी.

+
Coriander

Coriander Soup: किडनी आणि कॅल्शियमसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरच्या घरी झटपट कसं करायचं?

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: हिवाळ्यात आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात शरीराला उष्णतेचे गरज असल्याने तसे पदार्थ आहारात येण्याची गरज असते. या काळात काहीजण सूप पिण्याला प्राधान्य देतात. विविध भाज्यांचेही सूप बनवले जाते. थंडीत कोथिंबीरचे सूप पिणंही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी कोथिंबीर सूपची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
कोथिंबीर सूप साहित्य
कोथिंबीर सूप अगदी घरातील साहित्यापासून बनवू शकतो. त्यासाठी 1 वाटी कोथिंबीर, 2 चमचे भिजवलेले आणि मोड आलेले मूग, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा आणि एक हिरवी मिरची, काळीमिरी पावडर हे साहित्य लागेल.
advertisement
कोथिंबीर सूपची रेसिपी
सर्वप्रथम एका कढईमध्ये 3 वाट्या पाणी घ्यायचं. त्यामध्ये मोड आलेले मूग घालून त्याला उकळून द्यायचे. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि लगेच मूग आणि कोथिंबीर काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मूग, लसूण, आद्रक, एक हिरवी घ्यायचे आणि पाणी टाकून हे एकत्र एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर सर्व हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं आणि गॅस वरती ठेवून त्याला एक उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची. अशा पद्धतीने अगदी 5 ते 10 मिनिटांत सूप बनवून तयार होतं. त्यात आवश्यकतेनुसार लिंबू देखील टाकू शकता, असं डॉक्टर तल्हार सांगतात.
advertisement
दरम्यान, या हिवाळ्यामध्ये हे कोथिंबीरचे सूप अगदी झटपट तयार करू शकता. हिवाळ्यामध्ये हे सूप आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी ठरतं. विशेष म्हणजे शरीरात कॅल्शिअम वाढीसाठी आणि किडनीसाठी ते वरदान मानलं जातं. त्यामुळे तुम्ही हे आरोग्यदायी कोथिंबीर सूप आपल्या घरी नक्की ट्राय करू शकता.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Coriander Soup: किडनी आणि कॅल्शियमसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरच्या घरी झटपट कसं करायचं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement