खव्याची गरजच नाही! दिवाळीला बनवा मथुरा स्टाईल पेढे, अगदी सोपी रेसिपी

Last Updated:

Diwali Recipe: दिवाळीच्या फराळात मथुरा स्टाईल पेढा एक उत्तम पर्याय आहे. खव्याशिवाय अगदी 10 मिनिटांत ही रेसिपी तयार होते.

+
दिवाळीसाठी

दिवाळीसाठी करा झटपट असा मथुरा स्टाईल पेढा 

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आता थोड्याच दिवसांवरती आलेली आहे. दिवाळीसाठी घरोघरी वेगवेगळे गोडधोड पदार्थ बनवले जातात. तुम्हाला देखील या दिवाळीत वेगळं आणि झटपट असं काही करायचं असेल. तर तुम्ही मथुरा स्टाईल पेढा करू शकता. अगदी मोजून 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि मोजकच साहित्य लागतं. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी याची सोपी रेसिपी सांगितलीये.
advertisement
मथुरा स्टाईल पेढा बनवण्यासाठी साहित्य 
एक वाटी मिल्क पावडर, पिठी साखर, साजूक तूप, अर्धा वाटी दूध, जायफळ आणि वेलचीची पावडर एवढंच साहित्य लागेल.
कसा बनवायचा पेढा?
सर्वप्रथम गॅस वरती एक पॅन घ्यायचा. त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि एक वाटी मिल्क पावडर टाकायची. मिल्क पावडर व्यवस्थित रित्या भाजून घ्यायची. जोपर्यंत त्याला ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत ते भाजत राहायचं. त्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं. दूध थोडं थोडं टाकत व्यवस्थित रित्या एकजीव करून घ्यायचं आणि त्यात साखर टाकायची. साखर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही जास्त साखर टाकावी आणि तुम्हाला जास्त गोड नको असेल तर 3-4 चमचेच साखर टाकावी.
advertisement
साखर टाकल्यानंतर तयार झालेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. परत एकदा त्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. त्यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर टाकायची आणि एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर गोल पेढे करून घ्यायचे. पेढा तयार झाला की त्याला साखरेचं कोटिंग करायचं आणि वरून त्याला काजू लावायचा. अशा पद्धतीने हे झटपट मथुरा स्टाईल पेढे बनवून तयार होतात.
advertisement
दरम्यान, दिवाळीत काही हटके करण्याचा विचार करत असाल तर खव्याशिवाय होणारी ही पेढ्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
मराठी बातम्या/रेसिपी/
खव्याची गरजच नाही! दिवाळीला बनवा मथुरा स्टाईल पेढे, अगदी सोपी रेसिपी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement