दिवाळीचे वेध, कुंथलगिरिच्या खव्याला बाजारात मोठी मागणी, सध्याचे दर काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
Kunthalgiri Khawa - विशेष करून कुंथलगिरी व पाथरूड परिसरातील खवा हा दर्जेदार गुणवत्ता असल्यामुळे देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागरिकांकडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या खव्याला मोठी मागणी होते. या परिस्थितीचा खवा व्यावसायिक व दुध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे दिसत आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव - दिवाळी अगदी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वत्र बाजारात उत्साह, तसेच गर्दी दिसत आहे. दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण असल्याने विविध पदार्थ बनवले जातात. याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुंथलगिरिच्या खव्याला बाजारात मोठी मागणी मिळत आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा.
दर्जेदार गुणवत्ता, चविष्टपणा, शेकडो वर्षांची परंपरा यामुळे हा कुंथलगिरिचा खवा प्रसिद्ध आहे. जीआय मानांकनाच्या या कुंथलगिरिच्या खव्याचे प्रतिकिलो दर हे 40 ते 50 रुपयांनी वाढले आहेत. कुंथलगिरी व पाथरुड परिसरातील खवा व पेढा महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे.
advertisement
देशातील सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी कुंथलगिरीचा व पाथरूड परिसरातील खवा आणि पेढा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर दिवाळीच्या निमित्ताने याच कुंथलगिरीच्या खव्याला दिवाळी फराळासाठी मागणीला सुरुवात झाली आहे आणि त्यानिमित्त या खव्याचे बाजार भाव प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढले आहेत.
बँकेतली नोकरी सोडली अन् 26 व्या वर्षी बनली महाराष्ट्रातील पहिली महिला ST चालक, कोण आहे ही तरुणी?
गेल्या महिन्याभरापूर्वी खव्याचे बाजार भाव 180 ते 190 रुपये प्रति किलो होते. सध्या हेच बाजार भाव 240 ते 250 रुपये प्रति किलो झाले आहेत.
advertisement
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फराळासाठी बाजारात खव्याला मोठी मागणी असते. गुलाब जामुन, त्याचबरोबर विविध मिठाई बनवण्यासाठी खवा हा महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच बाजारात खव्याला मागणी वाढली आहे.
त्यातही विशेष करून कुंथलगिरी व पाथरूड परिसरातील खवा हा दर्जेदार गुणवत्ता असल्यामुळे देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागरिकांकडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या खव्याला मोठी मागणी होते. या परिस्थितीचा खवा व्यावसायिक व दुध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे दिसत आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 22, 2024 8:00 PM IST