Diwali Recipe: दिवाळीत अनारसे बिघडणार नाहीत! ‘या’ टिप्स लक्षात ठेवा अन् खुसखशीत, जाळीदार रेसिपी बनवा!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Diwali Recipe: दिवाळीत किचकट पदार्थ म्हणून अनेक गृहिणी अनारसे बनवण्याचे टाळतात. परंतु, अगदी सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास तुम्ही देखील खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवू शकता.
अमरावती: दिवाळीच्या फराळातील सर्वात किचकट असणारा पदार्थ म्हणजे अनारसे. अनेक गृहिणी हा पदार्थच बनवत नाहीत. कारण तो बिघडला की त्याला व्यवस्थित करायला खूप त्रास जातो. पण, योग्य प्रमाण आणि काही टिप्स वापरल्यास हा पदार्थ परफेक्ट असा तयार होतो. अनारसे बनवताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात? तसेच अनारसे बिघडल्यास कोणते उपाय करता येऊ शकतात? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
- अनारसे बनवताना सर्वात आधी प्रश्न येतो, तो म्हणजे तांदूळ निवडीचा. तर अनारसे बनविण्यासाठी कोणताही तांदूळ चालतो. फक्त ज्या तांदुळाचा भात चिकट होत असेल तो तांदूळ वापरू नये.
- दुसरं म्हणजे तांदूळ हे तीन दिवस भिजत ठेवणे गरजेचे आहे. तसेच दररोज त्यातील पाणी बदलवणे देखील गरजेचे आहे. पाणी जर बदलवले नाही तर तांदूळ चिकट येऊन खराब होतात.
- तिसरं म्हणजे तांदूळ सुकविण्यासाठी सुती कापड वापरा.
- तांदूळ बारीक करताना त्याचे पूर्ण पीठ करा. तसेच ते पीठ चाळणीने चाळून घ्या.
- त्यानंतर साखर आणि पिठाचे योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे. किंवा तुम्ही गूळ वापरत असल्यास ते देखील प्रमाणात असणे गरजेचे आहे. तांदळाचे पीठ आणि गूळ वापरत असल्यास गूळ हा पिठाच्या अर्धा असावा. म्हणजे 2 वाटी पीठ असेल तर 1 वाटी गूळ असावा. तर साखर ही पिठाच्या थोडी कमी असावी. म्हणजेच पीठ जर 2 ग्लास असेल तर साखर ही दीड ग्लास पर्यंत असावी.
- त्यांनतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पिठाला पाणी लावू नये. साखर आणि पीठ 3 दिवस मुरल्यानंतर जर ते पीठ सहज मळल्या जात नसेल तर थोडे पाणी लावू शकता. अन्यथा आवश्यकता नाही.
- त्यांनतर अनारसे तळताना तेल गरम झालेले असावे. तेल थंड असल्यास अनारसे तेलात विरघळतात. तेल जास्त गरम असल्यास अनारसे जळतात. त्यामुळे तेल साधारण गरम असणे आवश्यक आहे.
- काहीवेळा हे सर्व करूनही अनारसे तेलात विरघळतात. तेव्हा त्यात साखर जास्त झालेली असू शकते. त्यामुळे ते तेलात विरघळतात. अशावेळी तुम्ही त्यात थोडे तांदळाचे पीठ टाकून बघू शकता.
- काही वेळा असं होतं की अनारसे अगदी भाकरीसारखे होतात. अशावेळी तुम्ही त्यात थोडी साखर टाकून बघू शकता. किंवा थोडे केळं त्यात मिक्स करून बघू शकता.
advertisement
या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट असे अनारसे बनवू शकता.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
October 10, 2025 1:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Diwali Recipe: दिवाळीत अनारसे बिघडणार नाहीत! ‘या’ टिप्स लक्षात ठेवा अन् खुसखशीत, जाळीदार रेसिपी बनवा!