Diwali Recipe : दिवाळीला घरीच बनवा खमंग आणि खुसखुशीत शेव, या टिप्सने बनणार नाही तेलकट, संपूर्ण रेसिपी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
अनेकदा शेव तळल्यानंतर ती काही वेळाने नरम पडते, पण आज आपण पाहणार आहोत अशी शेव रेसिपी, जी नेहमीसारखी नरम न होता खुसखुशीत आणि खमंग राहील. या शेवेची खासियत म्हणजे ती आपण फक्त तीन पदार्थांपासून बनणार आहे.
पुणे: दिवाळी म्हटलं की फराळ आलाच... या फराळामध्ये काही पदार्थ असे असतात की त्यात जर थोडंसं प्रमाण कमी-जास्त झालं, तर ते लगेच बिघडतात. त्यापैकीच एक म्हणजे शेव. अनेकदा शेव तळल्यानंतर ती काही वेळाने नरम पडते, पण आज आपण पाहणार आहोत अशी शेव रेसिपी, जी नेहमीसारखी नरम न होता खुसखुशीत आणि खमंग राहील. या शेवेची खासियत म्हणजे ती आपण फक्त तीन पदार्थांपासून बनवणार आहे.
साहित्य काय लागेल?
या प्रकारची शेव अगदी कमी साहित्यात तयार होते. यासाठी हरभरा डाळीचे पीठ, मीठ चवीनुसार, तेल लागेल.
शेव बनवण्याची कृती
सुरवातीला हरभरा डाळीचे पीठ चाळणीने चाळून घ्या. यानंतर तुम्ही जितकी शेव करणार आहात त्यानुसार तेल घ्या आणि ते गरम करून या पिठात घाला. चमच्याने नीट मिक्स करा आणि थोडं तेल गार झाल्यावर हाताने सगळ्या गाठी फोडून घ्या, सगळ्या गाठी फोडून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालत घट्ट गोळा मळून घ्या.
advertisement
पीठ पातळ करू नका, कारण पातळ पीठ केल्यास शेव मऊ होते. तळण्यासाठी तेल 70 टक्के गरम करा आणि थेट गरम तेलात शेव गाळा. शेव गाळताना एकमेकांवर खूप थर देऊ नका, नाहीतर शेव नीट तळली जाणार नाही. गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवा. शेव तळण्यासाठी फार वेळ लागत नाही. हलक्या हाताने चमच्याने शेव पलटून दोन्ही बाजूंनी तळा आणि नीट तेल निथळून चाळणीत काढा. अशा प्रकारे कुरकुरीत आणि चविष्ट घरगुती शेव तयार होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Diwali Recipe : दिवाळीला घरीच बनवा खमंग आणि खुसखुशीत शेव, या टिप्सने बनणार नाही तेलकट, संपूर्ण रेसिपी Video