कारल्याचा कडूपणा झटक्यात होईल दूर, सगळे मिटक्या मारत खातील भाजी! सोपी रेसिपी
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Karela recipe: कारलं आरोग्यासाठी फायदेशीर असल्यानं ते पोटात जाणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यातला कडूपणा जास्तीत जास्त कसा काढता येईल हे माहित असायला हवं. आज आपण कारल्याच्या अशा भाजीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : कारलं कितीही कडू असलं तरी अनेकजण ते आवडीनं खातात. काहीजणांना कारल्याची भाजी आवडते, तर काहीजणांना भजी आवडते. शिवाय कारल्याचा रसही आरोग्यासाठी गुणकारी असतो. त्यामुळे रक्तातली शुगर कंट्रोल राहण्यास मदत मिळते, असं आहारतज्ज्ञ सांगतात. परंतु काहीजण मात्र कारल्याचं नाव जरी काढलं तरी नाक-तोंड मुरडतात.
कारलं आरोग्यासाठी फायदेशीर असल्यानं ते पोटात जाणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यातला कडूपणा जास्तीत जास्त कसा काढता येईल हे माहित असायला हवं. आज आपण कारल्याच्या अशा भाजीची रेसिपी जाणून घेणार आहोत, जी कधीच कारलं न खाणारेही मिटक्या मारत खातील.
advertisement
साहित्य : कारलं, मीठ, लाल तिखट, जिरं, तेल, शेंगदाणे, साखर.
कृती : कारलं बारीक चिरून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावं. त्यामुळे त्यातला कडूपणा निघून जातो. मग कढईत थोडं तेल तापवायचं. त्यात कारलं आणि कांदा परतून घ्यायचा. परतल्यानंतर मिश्रण 15-20 मिनिटं व्यवस्थित शिजू द्या.
कारलं शिजल्यावर त्यात आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्या. 5 मिनिटं पुन्हा शिजल्यानंतर त्यात थोडी साखर घालायची आणि पाणी सुटेपर्यंत शिजू द्यायचं. आता त्यात शेंगदाण्याचा कुट घालून छान परतून शिजू द्यायचं. शिजल्यानंतर भाजी खाण्यासाठी तयार असेल. त्यात तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 21, 2024 4:19 PM IST