दोनच साहित्य आणि 5 मिनिटांत नाश्ता तयार, विदर्भात फेमस आहे ही रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कमी वेळेत कमी साहित्यात फक्त दोन वस्तूंपासून झटपट चविष्ट नाश्ता आता घरीच बनवा. पाहा रेसिपी...
वर्धा, 10 ऑक्टोबर: रोज नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो. तेव्हा नाश्त्यासाठी नवीन डिश काय करावी असा प्रश्न गृहिणींना सतावत असतो. पण विदर्भात फेमस असणारी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. विशेष म्हणजे घरात उपलब्ध साहित्यातूनच हा खास पदार्थ तयार होतो. याच झटपट आणि कमी साहित्यातून बनणाऱ्या कणकेच्या गोड आयत्यांची रेसिपी वर्धा येथील गृहिणी कुमुद गायकवाड यांनी सांगितली आहे.
गोड आयते बनवण्यासाठी साहित्य
गव्हाच्या पिठाचे गोड आयते हा पदार्थ विदर्भात अनेकांच्या घरी आवडीने खाल्ला जातो. ही रेसिपी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून तयार होते. गोड आयते बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी साखर, थोडं तेल, मीठ आणि वेलची पूड एवढंच साहित्य आवश्यक आहे.
advertisement
कसे बनवायचे आयते?
सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार साखर ऍड करायची. हे महत्त्वाचे साहित्य झाल्यानंतर त्यात वेलची पूड आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. आता या मिश्रणात पाणी ऍड करून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही इतपत तयार करायचं आहे. या मिश्रणात गव्हाची कणिक चांगली भिजली पाहिजे मिश्रणात गाठी राहता कामा नये. आयते तयार करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक तवा वापरावा नॉनस्टिक तवा नसेल तर लोखंडी तव्यावर देखील तयार करता येईल. आता हे मिश्रण तव्यावर पसरवून दोन मिनिटे शिजू द्या. एका बाजूने शिजल्यानंतर थोडसं तेल लावून दुसऱ्या बाजूने पलटून घ्या. दोन्ही बाजू चांगल्या शिजल्यानंतर गरमागरम गोड आयते खाण्यासाठी तयार आहेत.
advertisement
कमी वेळेत पोटभर नाश्ता
वेळेची बचत करून पोटभर मिळणारी रेसिपी अशी या कणकेच्या आयत्यांची ओळख आहे. जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असेल आणि भूक लागली असेल त्यातही गोड खाण्याची इच्छा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे. सर्वांच्या घरी सहजरीत्या उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच ही रेसिपी बनवून तयार होते. दुपारच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी हेल्दी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही देखील नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 10, 2023 12:53 PM IST