Gatari Recipe: फक्त 5 मिनिटांत तयार होतात अंड्याचे काप, गटारीला बनवा हटके रेसिपी!

Last Updated:

Gatari Recipe: श्रावण सुरू होण्याआधी गटारीला अनेकजण मांसाहारी डिश बनवत असतात. कमी वेळ आणि साहित्यात तुम्ही अंड्याचे काप बनवू शकता.

+
Gatari

Gatari Recipe: फक्त 5 मिनिटांत तयार होतात अंड्याचे काप, गटारीला बनवा हटके रेसिपी!

मुंबई: श्रावण म्हणजे श्रद्धा, संयम, आणि सात्त्विकतेचा महिना. अनेकजण या महिन्यात उपवास, व्रतवैकल्यं पाळत असल्याने मांसाहार टाळतात. पण त्याआधी, म्हणजे श्रावण सुरू होण्याच्या केवळ एक-दोन दिवस आधीच, घराघरात काहीतरी झणझणीत, खास आणि लक्षात राहील असं खाणं हवं असतं. त्यासाठी अगदी योग्य ठरणारी आणि झटपट तयार होणारी डिश म्हणजेच ‘अंड्याचे काप’. याच रेसिपीबाबत मुंबईतील गृहिणी वैशाली कांबळे यांनी माहिती दिलीये.
अंड्याचे काप बनवण्यासाठी वेळ आणि साहित्यही अगदी कमी लागतं. पण तिची चव मात्र जिभेवर रेंगाळत राहते. अगदी स्टार्टर म्हणून असो किंवा मुख्य मेनू म्हणून सुद्धा ही डिश घरच्या घरी कुणीही बनवू शकतं. अगदी 5 मिनिटांत तयार होणारी ही चटपटीत आणि चविष्ठ रेसिपी पाहुया.
advertisement
साहित्य:  उकडलेली 3-4 अंडी, 1 चमचा लाल तिखट, चिमुटभर जिरे पावडर, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, पाणी, 1 चमचा तूप किंवा लोणी.
अंड्यांचे काप बनवण्याची कृती
या रेसिपीसाठी आधी उकडलेली अंडी तयार ठेवावीत. अंडी सोलून उभी कापून घ्या. त्यानंतर त्यावर लावण्यासाठी एक खास सारण बनवावं लागतं. हे सारण बनवण्यासाठी एक चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, चिमूटभर जिरे पावडर, एक चमचा गरम मसाला आणि थोडं पाणी लागेल. हे सर्व घटक एकत्र करून त्याचं एकसंध मिश्रण तयार करावं. हे तयार सारण अंड्याच्या चिरलेल्या भागाला लावून तूप किवा बटर टाकून पॅनमध्ये परतावं.
advertisement
मसाला भरलेले हे अंड्याचे काप चांगले भाजून घ्यावे. चवीला आणि दिसायला देखील ही रेसिपी अतिशय खास होते. तुम्ही अंड्याचे काप स्टार्टरलाही खाऊ शकता किंवा पोळी आणि गरम गरम भातासोबत सुद्धा ही हटके रेसिपी सर्व्ह करू शकता.
मराठी बातम्या/रेसिपी/
Gatari Recipe: फक्त 5 मिनिटांत तयार होतात अंड्याचे काप, गटारीला बनवा हटके रेसिपी!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement