Diwali Special Recipes: चुरोज् खाल्लंय कधी? दिवाळी फराळातला हा खास पदार्थ, यंदा बनवा, रेसिपी सोपी!

Last Updated:

Diwali Special Recipes: दिवाळीत लाडू, चकली, करंजी, चिवडा, शेवसोबत आपण काही वेगळे पदार्थ बनवण्याचा घाट घालतो. आपल्यालाही असा वेगळा, हटके पदार्थ बनवायचा असेल तर यंदा चुरोज् नक्कीच ट्राय करू शकता.

+
दिवाळी

दिवाळी स्पेशल रेसिपी.

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आहे. हा अनेकजणांच्या आवडीचा सण असतो, आपण त्याची वर्षभर आतुरतेनं वाट पाहतो. कारण या सणानिमित्त घरोघरी रोषणाई तर असतेच, शिवाय फराळाचा सुंगधही सर्वत्र दरवळतो. मागच्या वर्षीपेक्षा यंदा आपला फराळ उत्तम व्हावा असाच आपला प्रयत्न असतो. लाडू, चकली, करंजी, चिवडा, शेवसोबत आपण काही वेगळे पदार्थ बनवण्याचाही घाट घालतो. आपल्यालाही असा वेगळा, हटके पदार्थ बनवायचा असेल तर यंदा चुरोज् नक्कीच ट्राय करू शकता. डॉक्टर प्रज्ञा यांनी या गोड पदार्थाची सोपी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
चुरोज् बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, वाटीभर पाणी, साजूक तूप, खडीसाखरेची पावडर, चॉकलेट सिरप, दालचिनी पावडर, चकलीचा साचा.
कृती :
सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवून गॅस सुरू करा. त्यात वाटीभर पाणी ओता. मग चमचाभर साजूक तूप घालून ते पाण्यात एकजीव होऊद्या. याला एक उकळी येऊद्या. आता त्यात हळूहळू मैदा आणि तांदळाचं पीठ घालून संपूर्ण मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात अजिबात गुठळ्या राहायला नको. छान उकड काढून घेतल्यानंतर हातानं ती एकजीव करून घ्या.
advertisement
आता पॅनमध्ये साजूक तूप घालून ते व्यवस्थित तापवा. त्यानंतर तयार उकड चकलीच्या साच्यात घेऊन त्यातून चुरोज् पाडा आणि तुपात तळून घ्या. चुरोज् छान ब्राऊन होईपर्यंत तळा.
आता हे सर्व चुरोज् खडीसाखरेच्या पावडरमध्ये घाला. ते व्यवस्थितरित्या साखरेच्या कोटिंगमध्ये राहतील याची काळजी घ्या. मग त्यावर दालचिनी पावडर घाला. आता दालचिनी फ्लेव्हरचे चुरोज् बनून तयार आहेत.
advertisement
चॉकलेट चुरोज् बनवण्यासाठी आपण जे तळून घेतलेले चुरोज् आहेत त्याला साखरेचं कोटिंग केल्यानंतर वरून आवडीचा चॉकलेट सॉस घाला, मग चॉकलेट चुरोज् बनून तयार होतात. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Diwali Special Recipes: चुरोज् खाल्लंय कधी? दिवाळी फराळातला हा खास पदार्थ, यंदा बनवा, रेसिपी सोपी!
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement