Gajar Halwa Recipe: गाजर हलव्याची परफेक्ट रेसिपी, असा बनवाल तर बोटं चाखत बसाल, Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Gajar Halwa Recipe: कमी साहित्य, कमी वेळ आणि सोप्या पद्धतीने हा गाजराचा हलवा सहज तयार करता येतो. रेसिपी जाणून घेऊ. पाहूया झटपट गाजर हलवा कसा बनवायचा.
मुंबई: घरगुती गोड पदार्थांमध्ये गाजराचा हलवा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ मानला जातो. विशेष म्हणजे कमी साहित्य, कमी वेळ आणि सोप्या पद्धतीत हा हलवा सहज तयार करता येतो. दैनंदिन धावपळीत वेळ कमी असताना चविष्ट आणि पौष्टिक गोड पदार्थ हवा असल्यास ही रेसिपी उपयुक्त ठरते. गाजरात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘अ’, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे हा हलवा चविष्ट असण्यासोबतच आरोग्यदायीही आहे. गाजर हलव्याची रेसिपी पाहुयात.
गाजराचा हलवा साहित्य
गाजर – ४ मध्यम आकाराची (शिजवून घेतलेली), दूध – १ कप, साखर – ½ कप (चवीनुसार), तूप – २ टेबलस्पून, वेलची पूड – ½ टीस्पून, काजू, बदाम – २ टेबलस्पून (कापलेले), मनुका – १ टेबलस्पून आदी.
advertisement
गाजराचा हलवा कृती:
1) प्रथम गाजर स्वच्छ धुवून मध्यम आकाराचे कापून ते कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या करून शिजवून घ्या.
2) शिजवून झाल्यावर मग कढईत १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात वेलची पूड, काजू, बदाम आणि मनुका घालून चांगले लालसर भाजून घ्या.
3) मग त्यात शिजवलेले गाजरचे तुकडे घाला. त्यानंतर त्यात दूध घालून मिश्रण मॅश करून ते शिजू द्यावे.
advertisement
4) मध्यम आचेवर ५–७ मिनिटे गाजर परतावीत. दूध आटत येईपर्यंत मधूनमधून ढवळत राहावे.
5) दूध आटल्यावर त्यात साखर घालावी. साखर घातल्यानंतर हलव्यात थोडे पाणी सुटेल ते पूर्णपणे आटेपर्यंत शिजवावे.
6) हलवा कढईच्या कडांपासून सुटू लागला की गॅस बंद करावा.
झटपट टिप्स
view commentsमावा वापरल्यास हलवा आणखी स्वादिष्ट होतो. अवघ्या २०–२५ मिनिटांत तयार होणारा हा गाजर हलवा सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाली तरी उत्तम पर्याय ठरतो. गरमागरम गाजर हलवा सर्व्ह करून घरच्यांची आणि पाहुण्यांची मनं नक्की जिंकता येतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Gajar Halwa Recipe: गाजर हलव्याची परफेक्ट रेसिपी, असा बनवाल तर बोटं चाखत बसाल, Video









