Monsoon Recipe: वर्षात फक्त 30 दिवसच मिळते अत्यंत दुर्मिळ रानभाजी, पाहा झेटूनीच्या फुलांची रेसिपी, Video

Last Updated:

Monsoon Recipe: पावसाळ्यात काही अत्यंत दूर्मिळ रानभाज्या उगवतात. अशीच एक रानभाजी म्हणजे झेटूनीची फुले होय. याची रेसिपी पाहूयात.

+
Monsoon

Monsoon Recipe: वर्षात फक्त 30 दिवसच मिळते अत्यंत दुर्मिळ रानभाजी, पाहा झेटूनीच्या फुलांची रेसिपी, Video

जालना: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रानमाळावर विविध प्रकारच्या रानभाज्या उगवत असतात. पोषक तत्त्वांनी अत्यंत भरपूर असलेल्या या रानभाज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात. यापैकीच एक म्हणजे झेटूनीची फुले ही रानभाजी. पाऊस पडून गेल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर माळरानावर वेलाच्या स्वरूपात असलेल्या झाडावर ही फुले लगडतात. अत्यंत आरोग्यदायी मानल्या जाणाऱ्या रानभाजी झेटूनीच्या फुलांची रेसिपी पाहूयात.
झेटूनी फुलांच्या भाजीसाठी साहित्य
स्वच्छ धुवून घेतलेली झेटूनीची फुले, हळद, मीठ, तेल, मिरची पावडर, जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि लसूण इत्यादी.
झेटूनी फुलांच्या भाजीची कृती
सर्वप्रथम झेटूनीची फुले स्वच्छ धुवून घ्यावीत. यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यावा. त्याच बरोबर एक कांडी लसूण बारीक चिरून घ्यावा. गॅस सुरू करून त्यावर पातेलं किंवा कढई ठेवावी. त्यामध्ये दोन चमचे तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालावे. जिरे चांगले तडतडू लागल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालावा. कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि मिरची पावडर घालावी.
advertisement
ही फोडणी चांगली परतून घ्यावी. यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली फुले फोडणीमध्ये घालावी व चांगली परतून घ्यावी. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटे गॅसवर मध्यम आचेवर शिजू द्यावे. दहा मिनिटांनंतर गॅस बंद करून फुले एका प्लेटमध्ये घ्यावीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत इतर भाज्यांबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करावे.
अशा पद्धतीने अत्यंत कमी साहित्यात तुम्ही झेटूनीची फुले ही रेसिपी अत्यंत सोप्या पद्धतीने तयार करू शकता. अत्यंत रुचकर पोषक तत्वांनी भरपूर असलेली ही फुले सर्वांनी प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी अवश्य ट्राय करायला हवीत.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Monsoon Recipe: वर्षात फक्त 30 दिवसच मिळते अत्यंत दुर्मिळ रानभाजी, पाहा झेटूनीच्या फुलांची रेसिपी, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement