Health Tips: ग्रीन टी पिल्यानं खरंच वजन कमी होतं? नेमके फायदे काय? आहारतज्ज्ञांनी दिली माहिती

Last Updated:

Health Tips: वजन कमी करण्यासाठी किंवा मधुमेहींना नेहमीचा चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. या ग्रीन टीचा आरोग्यासाठी नेमका कसा फायदा होतो? जाणून घेऊ.

+
Health

Health Tips: ग्रीन टी पिल्यानं खरंच वजन कमी होतं? नेमके फायदे काय? आहारतज्ज्ञांनी दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. परंतु, काहीजण आरोग्याच्या बाबतीत सजगता दाखवत चहाचे वेगळे पर्याय निवडताना दिसतात. त्यातलंच एक चहा म्हणजे ग्रीन टी. काही लोकांना सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ग्रीन टी लागते. ग्रीन टी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु, ग्रीन टीचे नेमके फायदे काय आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती दिलीये.
नेहमीच्या चहापेक्षा ग्रीन टी पिणं कधीही चांगलं असतं. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात आणि ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, ते तर आवर्जून ग्रीन टी पितात. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते. ग्रीन टी मध्ये एल-थियानिन हे ऍसिड असतं आणि हे आपली एक ट्रेस लेव्हल कमी करायला मदत करते. तसंच यामध्ये एक कॅटेचिन नावाचा घटक असतो जो आपल्या पेशी डॅमेज होण्यापासून वाचवतो, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
ताण-तणाव जास्त असणारे आणि मधुमेहाचा त्रास अधिक असणारे आर्जून ग्रीन टी पितात. त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. जर तुम्हाला ग्रीन टी द्यायची असेल तर ती तुम्ही डिकॅफिनेटेड असलेली ग्रीन टी घ्यावी. तसंच त्याचं प्रमाण देखील कमी असावं. तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळेस ग्रीन टी घ्यावी. एक तर सकाळच्या वेळेमध्ये आणि एक संध्याकाळी सात वाजेच्या आतमध्येच घ्यावी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त वेळा ग्रीन टी घेऊ नये, असं आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
तुम्ही ग्रीन टी घरी देखील तयार करू शकता. त्यामध्ये तुम्ही घरातले आयुर्वेदिक मसाले वापरू शकता. तसेच बाजारात देखील चांगल्या ब्रँडचे ग्रीन टी उपलब्ध आहेत. ते देखील घेऊ शकता असं आहारतज्ज्ञ सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips: ग्रीन टी पिल्यानं खरंच वजन कमी होतं? नेमके फायदे काय? आहारतज्ज्ञांनी दिली माहिती
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement