सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार करा बीट रूट डोसा, आरोग्यासाठीही फायदेशीर, रेसिपी पाहा Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
डोसा बनविण्याचे अनेक प्रकार आहेत यामधील एक प्रकार म्हणजे बीट रूट डोसा. खरतर बीट हे फळ काही जणांना येवढं आवडीस पसंत येत नाही पण त्यापासून बनवलेले सर्वच पदार्थ हे चवीला टेस्टी लागतात.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करायला अनेकांना आवडतो. या दाक्षिणात्य खाद्यपदार्थांमध्ये इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे इत्यादी पदार्थांचा वापर नाश्त्यामध्ये हमखास केला जातो. डोसा बनविण्याचे अनेक प्रकार आहेत यामधील एक प्रकार म्हणजे बीट रूट डोसा. खरतर बीट हे फळ काही जणांना येवढं आवडीस पसंत येत नाही पण त्यापासून बनवलेले सर्वच पदार्थ हे चवीला टेस्टी लागतात. याचं पदार्थांपैकी बीट रूट डोस्याची रेसिपी आपल्या मुंबईतील गृहिणी माधुरी आंबोरे यांनी सांगितली आहे.
advertisement
बीट रूट डोसा बनवण्यासाठी साहित्य
1 बीट, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा, हळद, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा, हिंग, मीठ हे साहित्य लागेल.
बीट रूट डोसा बनवण्यासाठी कृती
प्रथम आपण बीट उकडून घ्यायचे, त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची, त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ, रवा, हळद, कांदा, मिरची, मीठ, त्यात तयार केलेली बीटाची पेस्ट घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. मिश्रण करताना थोडे थोडे पाणी घालून मध्यम प्रमाणात घोळ करून घ्यावा आणि 10 मिनिटे मिश्रण भिजू द्या. 10 मिनिटांनी डोसाच्या तव्यावर डोस्याप्रमाणे हे एकजीव केलेले सर्व मिश्रण सर्विकडे पसरवून घेऊन त्याच्या बाजूने तेल सोडून झाकून ठेवावे. 2 मिनटाने झाकण काढून, पलटवून घेऊन थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी छान परतून घ्यावे. अशा प्रकारे तयार आपला गरमागरम आणि पौष्टिक बीट रूट डोसा तयार होतो.
advertisement
बीट खाण्याचे शरीराला फायदे
बीट खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं सांगितलं जातं. बीट हे लोह, जीवनसत्व, फॉलिक आयसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते आणि रक्त शुद्ध करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2024 10:38 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार करा बीट रूट डोसा, आरोग्यासाठीही फायदेशीर, रेसिपी पाहा Video