Besan Kheer Recipe: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा पारंपरिक बेसनाची खीर, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
दहा दिवस सगळ्यांकडे गणपती बाप्पा विराजमान असतात. दररोज नैवद्यसाठी काय बनवायचं? हा प्रश्न सगळ्यांना पडतो. अशावेळी तुम्ही पारंपरिक रेसिपी बनवू शकता. त्यातीलच एक म्हणजे बेसन पीठ वापरून बनवलेली खीर.
अमरावती: दहा दिवस सगळ्यांकडे गणपती बाप्पा विराजमान असतात. दररोज नैवेद्यासाठी काय बनवायचं? हा प्रश्न सगळ्यांना पडतो. अशावेळी तुम्ही पारंपरिक रेसिपी बनवू शकता. त्यातीलच एक म्हणजे बेसन पीठ वापरून बनवलेली खीर. अगदी घरगुती आणि कमीतकमी साहित्यापासून ही खीर तयार होते. तसेच पारंपरिक असल्याने बाप्पाच्या आवडीची देखील आहे. पारंपरिक रेसिपी बेसनाची खीर कशी बनवायची पाहुयात.
बेसनाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
2 छोटे चमचे बेसन पीठ, 1 ग्लास दूध, 1 वाटी साखर, 2 छोटे चमचे तूप, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स पावडर हे साहित्य लागेल.
बेसनाची खीर बनवण्याची कृती
सर्वात आधी गॅसवर एक भांडे ठेवून त्यात तूप गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात बेसन पीठ टाकून ते भाजून घ्यायचं आहे. थोडं लालसर होईपर्यंत बेसन भाजा. झालं की, त्यात दूध टाकून घ्यायचं आहे. बेसन आणि दूध एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर त्याला उकळी काढून घ्यायची आहे.
advertisement
उकळी आल्यानंतर त्यात साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा उकळी काढून घ्यायची आहे. नंतर त्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक हलकी उकळी काढून घ्यायची आहे. टेस्टी अशी बेसनाची खीर तयार झालेली असेल. पुरी सोबत याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवू शकता. या खीरमध्ये ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे. तसेच बेसन पीठ देखील तुम्ही अंदाजानुसार घेऊ शकता. 2 चमचे बेसन पीठ आणि 1 ग्लास दूध वापरल्यास 3 वाटी खीर तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा, गणपती बाप्पासाठी पारंपरिक नैवेद्य बेसनाची खीर.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
September 02, 2025 6:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Besan Kheer Recipe: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा पारंपरिक बेसनाची खीर, रेसिपीचा संपूर्ण Video

