Cheap Food Nashik: 40 वर्षांची परंपरा, फक्त 35 रुपयांत मिळत घरगुती जेवण, नाशिकमधील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

गेल्या 40 वर्षांपासून शरद सराफ यांनी भोजनालय ही जनसेवा सुरू केली आहे. यामध्ये ते स्वस्तात जेवण देतात. 

+
News18

News18

नाशिक: नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे. या ठिकाणी रोज लाखो भाविक येत असतात. येणाऱ्या लोकांची जेवणाची सोय व्हावी याकरता गेल्या 40 वर्षांपासून शरद सराफ यांनी रामसेतू पुलाजवळ अजय भोजनालय ही जनसेवा सुरू केली आहे. यामध्ये ते स्वस्तात जेवण देतात.
शरद यांची सुरुवातीला पंचवटीतील रामसेतू पुलाजवळ एक छोटी चहाची गाडी होती. पंचवटीतील मुख्य भाग असल्याने यांच्याकडे रोज अनेक लोक येत असत. बरेच गोरगरीब नागरिक यांच्याकडे जेवणाची विचारपूस करत होते. यावेळी शरद यांना आपण भोजनालय सुरू करून एक जनसेवा करू अशी कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी 40 वर्षांपूर्वी फक्त 5 रुपयात अन्न सेवा सुरू केली होती. या सेवेत त्यांचा मुलगा रवींद्र आणि संपूर्ण कुटुंब त्यांना मदत करत असे.
advertisement
श्रीमंत असो अथवा गरीब, या अजय भोजनालय आणि जनसेवा केंद्रातील घरगुती जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय पंचवटीतून निघत नाही. तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने यात कुठलाही व्यवसाय नको या विचारामुळे शरद सराफ यांच्याकडे जेवण फक्त 35 रुपयांत आता मिळत असते.
advertisement
इतकेच नाही तर कुणाकडे पैसे नसले तरी या ठिकाणी त्या लोकांना मोफत जेवण दिले जात असते. आजही हीच सेवा शरद यांचे चिरंजीव रवींद्र हे पुढे नेत आहेत. आज 35 रुपयात यांच्याकडे सर्व लोक पोटभर जेवण करून जात असतात. तीन भाकरी, रस्सेदार भाजी आणि भात असे यांच्याकडे जेवण मिळत असते. तुम्ही देखील नाशिकला आलात तर पंचवटी येथील राम सेतू पुलाजवळील शनि मंदिराच्या बाजूला असलेल्या अजय भोजनालयाला नक्की भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Cheap Food Nashik: 40 वर्षांची परंपरा, फक्त 35 रुपयांत मिळत घरगुती जेवण, नाशिकमधील हे ठिकाण माहितीये का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement