सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
कॅल्शिअमची कमी असल्यास डॉक्टरांकडून अनेक टॉनिक आणि टॅब्लेट दिल्या जातात. पण, योग्य आहार घेतल्यास अनेक आजार बरे होतात. आहारात जर कडीपत्ता आणि तीळ याची चटणी नियमित घेतली तर त्यातून भरपूर कॅल्शिअम मिळतं.
अमरावती : हिवाळा सुरू झाला की, सांधेदुखी, अंगदुखी आणि बरेच त्रास होतात. सांधे दुखण्याचे कारण असू शकते कॅल्शिअमची कमी. अशावेळी डॉक्टरांकडून अनेक टॉनिक आणि टॅब्लेट दिल्या जातात. पण, योग्य आहार घेतल्यास अनेक आजार बरे होतात. आहारात जर कडीपत्ता आणि तीळ याची चटणी नियमित घेतली तर त्यातून भरपूर कॅल्शिअम मिळते. त्यामुळे सांधेदुखी कमी होऊ शकते. तुम्हाला जर आहारात तीळ आणि कडीपत्ता चटणी घ्यायची असेल तर रेसिपी माहीत असणे आवश्यक आहे. जाणून घेऊ रेसिपी
कडीपत्ता आणि तिळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी तीळ, 1 वाटी कडीपत्ता, हिरवी मिरची, लसूण पाकळी, मीठ, जिरे, हळद आणि तेल हे साहित्य लागेल.
कडीपत्ता आणि तिळाची चटणी बनवण्याची कृती
advertisement
सर्वात आधी तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजून घेतले की, त्याच भांड्यात कडीपत्ता सुद्धा भाजून घ्यायचा आहे. कडीपत्ता भाजण्यासाठी भांड्यात तेल टाकायचे. तेल गरम झाले की, जिरे टाकायचे. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा. लसूण आणि मिरची थोडी फ्राय करून घ्यायची त्यानंतर लगेच त्यात कडीपत्ता टाकून घ्यायचा.
कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर कडीपत्ता आणि तीळ बारीक करून घ्यायचे आहे. त्यावेळी त्यात मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पौष्टिक अशी चटणी तयार होईल. दररोजच्या जेवणात ही चटणी तुम्ही घेऊ शकता. यात खायच्या वेळी लागत असल्यास थोडा लिंबाचा रस देखील तुम्ही टाकू शकता.
advertisement
कडीपत्ता आणि तीळ हे प्रमाण तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे कमी जास्त करू शकता. तसेच यात थोडी चणा डाळ आणि उडीद डाळ सुद्धा तुम्ही टाकू शकता.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
October 28, 2025 9:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा संपूर्ण Video

