Egg Pulao Recipe : हिवाळ्यात जेवणात काहीतरी स्पेशल हवंय? झटपट तयार होणारा बनवा अंडा पुलाव, रेसिपीचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे आज आपण अंड्यापासून झटपट तयार होणारा पुलाव कसा बनवावा पाहणार आहोत.
पुणे: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गारठा पडत आहे. थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे आज आपण अंड्यापासून झटपट तयार होणारा पुलाव कसा बनवावा पाहणार आहोत. हा पुलाव अगदी कमी वेळात आणि काही मोजक्या साहित्यात बनतो.
अंडा पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तांदूळ, अंडी, तेल, हळद, लाल मिरची, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मसाला वेलची, स्टार फूल, काळी मिरी, बिर्याणी मसाला, धणे-जिरे पूड, कसुरी मेथी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
advertisement
अंडा पुलाव बनवण्यासाठी कृती
सुरुवातीला अंडी उकडून त्यांची साल काढून घ्या. कुकरमध्ये थोडं तेल गरम करा आणि त्यात थोडी हळद, लाल तिखट घालून अंडी काही मिनिटे परतून बाजूला ठेवा. त्याच तेलात खडे मसाले टाकून हलके परता. मग त्यात कांदा घालून तो छान सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून थोडा वेळ परतवा. आता आलं-लसूण पेस्ट टाकून मसाला नीट भाजून घ्या. त्यात धुतलेले तांदूळ घालून थोडंसं परतून कसुरी मेथी घाला.
advertisement
नंतर गरम पाणी ओता आणि बिर्याणी मसाला, धणे-जिरे पूड, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हलके मिक्स करा. वरून परतलेली अंडी ठेवून कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या करा. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा आणि पुलाव हलक्या हाताने मिक्स करा. प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर टाकली की अंडा पुलाव सर्व्ह करण्यास तयार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 25, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Egg Pulao Recipe : हिवाळ्यात जेवणात काहीतरी स्पेशल हवंय? झटपट तयार होणारा बनवा अंडा पुलाव, रेसिपीचा Video








