उपवासाचा पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का? बनवण्याची ही सोपी पद्धत पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
उपवासाचा पिझ्झा अगदी झटपट असा तयार होतो. अगदी घरच्या साहित्यामधूनच तुम्ही हा पिझ्झा तयार करू शकता.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आपण सर्वजण अगदी आवडीने पिझ्झा हा खातो. सर्वांना पिझ्झा खायला आवडतं. पण तुम्ही कधी उपवासाचा पिझ्झा खाल्ला आहे का? उपवासाचा पिझ्झा अगदी झटपट असा तयार होतो. अगदी घरच्या साहित्यामधूनच तुम्ही हा पिझ्झा तयार करू शकता. हा पिझ्झा कसा बनवायचा याचीच रेसिपी छत्रपती संभाजीनगरमधील येथील गृहिणी प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
advertisement
पिझ्झासाठी लागणारे साहित्य
उभे चिरलेले बटाट्याचे काप, लाल तिखट, तूप, काळे द्राक्ष, इनो, भगर आणि साबुदाण्याचे पीठ, चीज, बटाट्याचा खीस, चिली फ्लेक्स, पनीर, हिरवी मिरची ( तिखट नसलेली मिरची ), सैंधव मीठ हे साहित्य लागेल.
पिझ्झा तयार करण्याची कृती
सर्वप्रथम तव्यावरती बटाट्याचे काप टाकायचे. 10 ते 12 मिनिटांत चांगले फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या गरजेनुसार पीठ घ्यायचं. पाणी आणि थोडसं मीठ टाकून फेटून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. ते पीठ त्या बटाट्याच्या कपावर टाकायचं आणि 10 मिनिटे तसेच ठेवून द्यायचं. सॉस तयार करण्यासाठी पॅनमध्ये थोडं तूप टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये तिखट टाकायचं आणि बटाट्याचा खिस आणि चीज हे पाणी टाकून पातळ करून घ्यायचं. ते त्या कढईत टाकायचं आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. त्यामधे थोडंसं मीठ देखील टाकायचं. हिरवी मिरची आणि पनीर हे थोडसं फ्राय करून घ्यायचं.
advertisement
घरच्या घरी कोबी पासून बनवा स्क्रीप्सी व्हेज ड्राय मंच्युरियन, सोप्या रेसिपीचा पाहा Video
नंतर बटाट्याचे काप आणि पीठ टाकलेला बेस आहे तो उलटा करून घ्यायचा म्हणजे पलटून घ्यायचा. त्यानंतर त्यावरती आपण जो सॉस केलेला आहे तो टाकायचा आहे आणि वरतीनंतर टॉपिंगसाठी पनीर आणि हिरवी मिरची टाकायची. आणि काळ्या द्राक्षाची काप टाकायचे आणि त्यावरती चीज टाकायचं. चीज मेल्ट झालं की एका डिशमध्ये तो पिझ्झा काढून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने हा पिझ्झा तयार होतो. चीज हे दुधापासून तयार होतं त्यामुळे ते उपवासासाठी चालतं, असं गृहिणी प्रज्ञा तल्हार सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
March 06, 2024 8:58 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उपवासाचा पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का? बनवण्याची ही सोपी पद्धत पाहा Video