Garlic Chicken Recipe : हॉटेलची चवंच विसरून जाल, घरीच बनवा चमचमीत गार्लिक चिकन, रेसिपीचा Video
- Reported by:
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मार्गशीर्ष महिन्याचे उपवास संपले की नॉनव्हेज प्रेमींना चिकन मटण खाण्याची नक्कीच इच्छा झाली असणार. पण नेहमीच चिकन, मटण खाऊन बोर झाला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत.
कल्याण : मार्गशीर्ष महिन्याचे उपवास संपले की नॉनव्हेज प्रेमींना चिकन मटण खाण्याची नक्कीच इच्छा झाली असणार. पण नेहमीच चिकन, मटण खाऊन बोर झाला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही घरीच स्पेशल गार्लिक चिकन करू शकता. चला तर जाणून घेऊयात चमचमीत गार्लिक चिकन साधी आणि सोपी रेसिपी
गार्लिक चिकन साहित्य
चिकन: बोनलेस चिकनचे तुकडे (साधारण १/२ किलो)
मॅरीनेशनसाठी: आले-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट, काळी मिरी पावडर, तेल
तळण्यासाठी/परतण्यासाठी: बटर किंवा तेल, भरपूर लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
चवीसाठी: पनीर चिली मसाला १ पॅकेट (अर्धा किलो चिकनसाठी एक पॅकेट), गरम मसाला (पर्यायी), लाल मिरची फ्लेक्स (पर्यायी), ताजी कोथिंबीर/ओरेगॅनो (सजावटीसाठी)
advertisement
गार्लिक चिकन कृती :
चिकन मॅरीनेट करा: चिकनचे तुकडे मीठ लावून स्वच्छ धुवा.
आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, थोडे तेल घालून चिकन ३-४ तास मॅरीनेट करा.
चिकन तळा: एका कढईत तेल किंवा बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला भरपूर लसूण परतून घ्या. नंतर मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे टाकून सोनेरी होईपर्यंत तळा.
advertisement
सॉस/ग्रेव्ही बनवा: चिकन तळल्यावर, त्यात आवश्यकतेनुसार थोडे पाणी किंवा चिकन स्टॉक, चिकन मसाला, गरम मसाला घालून ग्रेव्ही घट्ट होऊ द्या. चवीनुसार मीठ तपासा.
सर्व्ह करा: गार्लिक चिकन तयार आहे. वरून ताजी कोथिंबीर किंवा ओरेगॅनो घालून गरम गरम सर्व्ह करा. हे स्टार्टर म्हणून किंवा भाकरी/रोटीसोबत छान लागते.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 4:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Garlic Chicken Recipe : हॉटेलची चवंच विसरून जाल, घरीच बनवा चमचमीत गार्लिक चिकन, रेसिपीचा Video










